महाराष्ट्रातील बांग्लादेशी व पाकिस्तानी घुसखोरांना हाकलण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (MNS) आज मुंबईत महामोर्चाचं आयोजन करण्यात आले आहे, सध्या दादर येथील राम मंदिरात (Ram Mandir) आरती करुन या मोर्च्याला सुरुवात करण्यात आली आहे. पक्षाचे सर्वेसर्वा राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चासाठी सकाळपासूनच राज्यभरातील मनसैनिक मुंबईच्या दिशेनं निघाले होते. मनसेनं राजकीय भूमिका बदलल्यानंतरचा हा पहिला मोर्चा असल्याने हा चर्चेचा मुद्दा ठरत आहे. साहजिकच यामुळे मोर्च्याला गर्दी होऊन वाहतुकीच्या मार्गात अडथळा निर्माण होण्याची शक्यता होती, यावर तोडगा म्ह्णून मुंबई पोलिसांकडून ट्राफिक ऍडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. सकाळी 11 ते 7 वाजेपर्यंत वाहतूक मार्गातील हा बदल लागू केला जाणार आहे. आज दिवसभरातील क्षणोक्षणीचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी क्लिक करा
प्राप्त माहितीनुसार, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी रॅपिड ऍक्शन फोर्स (आरएएफ) सहित दंगल नियंत्रण पोलिस व अन्य शेकडो कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.या रॅलीची सुरुवात मुंबईतील हिंदू जिमखान्यातून होईल आणि समारोप आझाद मैदानावर होईल. सुरळीत वाहतुकीची गती होण्यासाठी मुंबई पोलिसांनी वाहतूक ऍडव्हायजरी सांगितली आहे, जाणून घ्या..
वाहतुकीसाठी बंद
महापालिका मार्ग (दोन्ही सीमारेषा): जंक्शन सीएसएमटी ते मेट्रो जंक्शनपर्यंत महापालिका मार्ग (दोन्ही हद्दी) आपत्कालीन सेवा वगळता सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
महात्मा गांधी मार्ग (दोन्ही मर्यादा): जंक्शन ओसीएस जंक्शन ते मेट्रो जंक्शन पर्यंत महात्मा गांधी मार्ग (दोन्ही सीमारेषे) सर्व वाहनांसाठी बंद असेल.
शामलदास गांधी मार्ग: शामलदास गांधी मार्गामार्गे चौपाटीकडे जाणारा प्रिन्स स्ट्रीट ब्रिज
काळबादेवी मार्ग: वर्धमान जंक्शन ते मेट्रो जंक्शन
एमके रोड: शामलदास गांधी जंक्शनच्या दिशेने एमके रोड / प्रिंसेस ब्रिज जे
नो पार्किंग झोन
- महापालिका मार्ग
- बद्रुद्दीन तैयबजी मार्ग
- डीएन रोड
- एलटी मार्ग
- एमजी मार्ग
- हजारीमल सोमानी मंग
मुंबई वाहतूक पोलीस ट्विट
दि. ०९/०२/२०२०२० रोजी आझाद मैदान येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची जाहिर सभा होणार असल्यानिमित्ताने वाहतूक सुरळीत राखण्याकरिता वाहतूक पोलीसांकडून खालीलप्रमाणे वाहतुकीचे नियमन सकाळी ११:०० वा. ते सायं.१९.०० वा. पर्यंत लागू करण्यात आले आहेत. pic.twitter.com/Gv8XWtaxqG
— Mumbai Police (@MumbaiPolice) February 8, 2020
मनसेच्या या महा मोर्चा आणि मेळाव्यावर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई पोलीस अतिरिक्त 600 पोलिस कर्मचार्यांसह ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेरे वापरणार आहेत. पक्षाच्या अस्तित्वासाठीच्या संघर्षादरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता हिंदुत्तवाची कास धरून सुरु केलेला हा नवा प्रयत्न कितपत सफल ठरतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.