Devendra Fadnavis (Pic Credit - ANI)

Maharashtra Phone Tapping Case: मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) महाराष्ट्राचे (Maharashtra)माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Former Maharashtra CM Devendra Fadnavis) यांना नोटीस (Notice) पाठवली आहे. फोन टॅपिंग प्रकरणी (Maharashtra Phone Tapping Case) फडणवीस यांना मुंबईतील बीकेसी पोलिसांनी नोटीस बजावून त्यांचे म्हणणे नोंदवण्यासाठी समन्स बजावले आहे.

या प्रकरणी स्वतः माहिती देताना महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी उद्या म्हणजेच रविवारी पोलीस ठाण्यात जाऊन जबाब नोंदवणार असल्याचे सांगितले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, मला CRPC च्या कलम 160 अंतर्गत मुंबई पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे. ज्यामध्ये मला उद्या सकाळी 11 वाजता BKC सायबर पोलिस स्टेशनमध्ये त्यांच्यासमोर हजर राहण्यास सांगितले आहे. मी तिथे जाऊन माझे म्हणणे नोंदवणार आहे, असंही फडणवीस यांनी म्टटलं आहे. (वाचा - नाशिक: अवकाळी पावसामुळे गहू, कांदा, मका शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान; लवकरात-लवकर पंचनामा करून शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत द्यावी, आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांची मागणी)

विरोधी पक्षनेता म्हणून मला माहिती कोठून मिळाली हे उघड न करण्याचा विशेषाधिकार आहे. परंतु, मी एकदा गृहमंत्री होतो आणि मला माझी जबाबदारी समजते. जर खोटा गुन्हा नोंदवला गेला असेल आणि पोलिसांना काही मदत हवी असेल तर मी प्रतिसाद देईन. त्यामुळे उद्या पोलीस ठाण्यात जाईन.

महाराष्ट्रातील फोन टॅपिंग प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणी पुणे आणि मुंबईत एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील भाजप सरकारच्या कार्यकाळात अनेक नेत्यांचे फोन टॅप झाल्याचा आरोप आहे.