कोरोना व्हायरसचा (Coronavirus) राज्यातील वाढता प्रभाव पाहता मुंबईत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहे. कोरोना व्हायरसचे राज्यात एकूण 32 रुग्ण आढळून आले आहेत. दिवसागणित कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच जमावबंदीचा हा आदेश 31 मार्चपर्यंत लागू राहणार आहे. त्यामुळे या काळात टुर्सवर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय मुंबई दर्शन, बिझनेस टुर्सही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पर्यटन संस्थांनी टुर्स आयोजित न करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
यापूर्वी ही सरकारने स्वच्छता पाळण्यासोबतच गर्दीची ठिकाणं टाळण्याचे आवाहन वारंवार केले होते. मात्र राज्यातील कोरोना व्हायरसची वाढती संख्या लक्षात घेता परिस्थिती आटोक्यात राहण्यासाठी जमावबंदीचा आदेश देण्यात आला आहे. (महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ; औरंगाबाद येथील 59 वर्षीय महिलेला कोरोना व्हायरसची लागण)
ANI Tweet:
To prevent spread of #COVIDー19, Mumbai Police has issued order prohibiting any tour involving group of people travelling together to a foreign/domestic destination organised by pvt tour operators or otherwise Mumbai Police has issued order using powers u/s 144 CrPC. Order shall remain in force till 31st March pic.twitter.com/1FeO5ZwIHG
— ANI (@ANI) March 15, 2020
कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी देशात तसंच परदेशात प्रवास करण्यास मनाई केली आहे. अपवादात्मक परिस्थितीत एखाद्या व्यक्तीला प्रवास करावा लागला तर त्यांना पोलिस कमिशनर ऑफिसमधून परवानगी घेणे बंधनकारक असेल.
Mumbai Police: However, should anyone, including private tour operators, need to travel under exceptional circumstances, they may do so after seeking permission from the office of the Commissioner of Police, Greater Mumbai. https://t.co/lCnU3gqKSX
— ANI (@ANI) March 15, 2020
आदित्य ठाकरे ट्विट:
पोलिसांनी दिलेले आदेश हे प्रायव्हेट टुर्स ऑपरेटर्ससाठी असून बिझनेस आणि पर्यटनासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या टुर्सवर निर्बंध घालण्यात आल्याची माहिती पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटद्वारे दिली आहे. तरी देखील कोणावर अशाप्रकारची सक्ती केली गेल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.
Specific orders by @MumbaiPolice issued for Private Tour Operators to prohibit conduct of business/ holiday tour.
If anyone still forces any private individuals, they may report to police for further guidance https://t.co/24SEYBTiyB
— Aaditya Thackeray (@AUThackeray) March 15, 2020
महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 32 झाली असून कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्यातील शाळा, कॉलेज, सिने-नाट्यगृहे, मॉल्स, बगिचे, जिम आणि स्विमिंग पूल्स 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.