Savitri Bai Phule यांच्याबद्दल अवमानकारक मजकूर प्रकाशित, दोन वेबसाइट्सविरुद्ध एफआयआर दाखल
Maharashtra Police | (Photo Credit - Twitter/ANI)

समाजसुधारक सावित्रीबाई फुले (Savitri Bai Phule) यांच्या विरोधात बदनामी आणि अवमानकारक मजकूर प्रकाशित केल्याबद्दल मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दोन वेबसाईट्स विरोधात एफआयआर (FIR ) दाखल केला आहे. इंडिकटेल्स (IndicTales) आणि हिंदूपोस्ट (Hindupost) अशी या वेबसाईट्सची नावे आहेत. या वेबसाईट्सवरुन प्रकाशित झालेल्या मजकूरावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. राजकीय वातावरणही तापले होते. दोन्ही वेबसाईट्सवर गुन्हा दाखल होण्याची मागणी विरोधकांसह विविध क्षेत्रातून होत होती.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, इंडिकटेल्स आणि हिंदूपोस्ट या वेबसाइट्सवर सावित्रीबाई फुले यांच्या विरोधात बदनामीकारक मजकूर प्रकाशित केल्याचा आरोप आहे. त्यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 500 आणि 505(2) अंतर्गत आझाद मैदान पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. (हेही वाचा, Ahilyabai Holkar Jayanti 2023 Images: अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त Facebook Messages, WhatsApp Status आणि खास संदेश)

ट्विट

प्राप्त माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी हा गुन्हा नोंदवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी नुकतीच मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये इंडिकटेल्स आणि हिंदूपोस्ट या दोन्ही वेबसाईट्सवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी लावून धरण्यात आली होती. दरम्यान, दाखल तक्रारीवरुन पोलिसांनी एफआयआर दाखल केला.