Sec 144 In Mumbai: मुंबई मध्ये कलम 144 अंतर्गत 30 सप्टेंबर पर्यंत जमावबंंदी कायम राहणार,नवे निर्बंध नाही- मुंंबई पोलिस
Coronavirus (Photo Credits: IANS) Representational Image

Mumbai Police Imposed 144: देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यात अनलॉक-4 नुसार काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी दिली आहे. मात्र आता अधिकच कोरोनाग्रस्त आढळून येत असल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसून आले आहे. याच दरम्यान आता मुंबईत (Mumbai) येत्या 30 सप्टेंबर कलम 144 म्हणजेच जमावबंदी लागू करण्यात येणार आहे. राज्य सरकारने अगोदरच 31 ऑगस्ट पर्यंत जमावबंंदी लागु केली होती ज्यात ही वाढ करण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त मुंबईत पोलिसांकडून कोणत्याही नव्या नियमांची अमंलबजावणी करण्यात आली नसल्याचे ही स्पष्ट करण्यात आले आहे.

कोरोनाच्या रुग्णांचा आकडा मुंबईत दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे प्रशासन अधिक चिंतेत पडले आहेत. याच कारणास्तव आता कलम 144 लागू केला आहे. त्यानुसार अत्यावश्यक सेवासुविधांमधील कर्मचाऱ्यांना या काळात प्रवास करता येणार आहे. परंतु त्यांनी फिजिकल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असणार आहे. कमीत कमी सहा फुटांचे अंतर ठेवावे असे ही स्पष्ट करण्यात आले होते. यापूर्वी हे अंतर 3 फूट होते. अत्यावश्यक असल्यास घराबाहेर पडण्यासोबत मास्क लावणे अनिवार्य असणार आहे.(Coronavirus: कोरोना पुढे, देश मागे हेच वास्तव; केंद्र सरकारचे फक्त वादे, दावे- शिवसेना)

ज्या नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन केले जाईल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा सुद्धा इशारा देण्यात आला आहे. आर्थिक चालना मिळावी म्हणून राज्य सरकारने मिशन बिगिन अगेन नुसार टप्प्याटप्प्याने अनलॉकिंगनुसार काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी दिली आहे. मात्र यावेळी सुद्धा नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. अन्यथा शिथिल करण्यात आलेले नियम पुन्हा काढून घेतले जातील असे यापूर्वी स्पष्ट करण्यात आले होते. पण आता रुग्णांचा आकडा वाढल्याने पुन्हा नियम कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Coronavirus: 10 रुग्ण कोरोना व्हायरस पॉझिटीव्ह आढळल्यास इमारत सील करणार, मास्क नसल्यास 200 रुपये दंड- मुंबई महापालिका)

दरम्यान, राज्य सरकारने कोरोनाची एकूणच परिस्थिती पाहता अद्याप सिनेमागृह, प्रार्थना स्थळ, धार्मिक स्थळ, जलतरण तलाव, जिम, मेट्रो बंद ठेवले आहेत. तसेच नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे असे वारंवार सुचना ही दिल्या आहेत. ऐवढेच नाही तर नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करण्याचा हे स्पष्ट केले आहेत. राज्यात सध्या कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 11,21,221 वर पोहचला आहे. तर मुंबईत कोविड19 च्या रुग्णांचा आकडा 175974 वर गेला असून 8280 जणांचा आतापर्यंत बळी गेला आहे. तसेच 135563 जणांनी कोरोनावर मात केली असून 31766 रुग्णांवर अद्याप उपचार सुरु आहेत.