मुंबईतील माहीम दरगाह (Mahim Dargah) जवळ उर्स मध्ये झालेली आतषबाजी रोखण्याच्या प्रयत्नामध्ये एक पोलिस कॉन्स्टेबल जखमी झाल्याची बाब समोर झाली आहे. ही घटना रविवार (18 डिसेंबर) ची आहे. रविवारी प्रथेप्रमाणे संदल जुलूस निघाला होता. या मिरवणूकीमध्ये काहींनी फटाके फोडले. पण नियमानुसार रात्री 10 नंतर ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी फटाके फोडण्यावर बंदी आहे. त्याच नियमांचं पालन करण्याच्या सूचना हा पोलिस कॉन्स्टेबल (Police Constable) देत होता. पोलिसाने पायाने फटाके विझवण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला आणि फुटला. दरम्यान या प्रकरणी शादाब खान, शोएब खान आणि इकबाल खान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोशल मीडीयामध्येही या घटनेचा व्हिडिओ वायरल होत आहे. ज्यात दरगाह जवळ फटाके फोडण्याचा प्रयत्न करणार्यांना पोलिस हटकत असल्याचं दिसत आहे. पण तरूण ऐकतच नसल्याने पोलिसाने ते बाजुला केले पण यामध्ये पेटलेला फटाखा फुटला आणि त्याला हाताला गंभीर दुखापत झाली. दरम्यान त्याच्या मागे रॉकेट देखील उडवले जात असल्याचं पहायला मिळालं आहे. नक्की वाचा: Video: गुरुग्राममध्ये चालत्या कारवर फटाके फोडले; व्हिडीओ व्हायरल, पोलिसांकडून 3 जणांना अटक (Watch) .
पहा वायरल व्हिडिओ
ON CAMERA: Mumbai Police constable injures himself while dousing fireworks during Sandal procession in Mahim#Mumbai #MumbaiNews #MumbaiPolice #Mahim #Injury #Fireworks #ViralVideo pic.twitter.com/vuyfoAmJMK
— Free Press Journal (@fpjindia) December 19, 2022
माहिमच्या हजरत पीर मखदूम शाह बाबा यांच्या सन्मानार्थ ही मिरवणूक काढली जाते. संदल जुलूसला 120 वर्षांची परंपरा आहे. या निमित्ताने माहिमला जत्रा देखील भरते. कोरोना संकटकाळात ही जत्रा आणि मिरवणूक देखील निघू शकली नव्हती. मात्र यंदा पुन्हा पूर्वीप्रमाणे ही भव्य मिरवणूक निघाली. या मिरवणूकीत हजरत पीर मखदूम शाह बाबा यांना पहिली चादर चढवण्याचा मान मुंबई पोलिसांना दिला जातो. पोलिसांकडूनही दरगाह ला सलामी देण्याची परंपरा आहे.