
मुंबई (Mumbai) येथील गोरेगाव परिसरात सेक्स रॅकेट प्रकरणी एका बॉलिवूड अभिनेत्रीला अटक केली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या कारवाईमधून छोड्या पडद्यावरील अभिनेत्रीही या व्यवसायात असल्याचे समोर आले आहे. मुबई येथील पोलिसांच्या समाजसेवा शाखेच्या पथकाने अंधेरीतील (Andheri) एका हॉटलमध्ये कारवाई करत मराठी अभिनेत्रीसह तिघांची सुटका केली आहे. तसेच याप्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित अभिनेत्रीला जबरदस्तीने देहविक्रेयच्या व्यवसायात ढकलेले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मुंबईत अनेक ठिकाणी सेक्स रॅकेट सुरु असून यावर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सतत प्रयत्न केले जात आहेत. मुंबई पोलिसांच्या कारवाईमधून सेक्स रॅकेटमधील बॉलिवूड कनेक्शन वारंवार उघड होत आहेत. यातच अंधेरी येथील एका हॉटेलमध्ये सुरु असलेल्या हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या रॅकेटमधून पोलिसांनी दोन अभिनेत्री आणि एका अल्पवयीन अभिनेत्रीची सुटका आहे. याप्रकरणातील आरोपी आवेश, विनय आणि कुलदिप जेनी हे तिघही मुख्य आरोपी महिला दलाल प्रिया शर्मा यांच्या संपर्कात होते. प्रिया शर्मा यांच्यासह चौघांना अटक केली आहे. महत्वाचे म्हणजे, या तिन्ही अभिनेत्रींना जबरदस्तीने देहविक्रेयच्या व्यवसायात ढकलेले होते. प्रिया शर्मा ही रॅकेट चालवत होती. प्रिया शर्मा हीचा टुर अॅंड ट्रव्हलिंगचा व्यवसाय असून तिचा काळ्या उद्योगात हात होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. हे देखील वाचा- धक्कादायक! मुंबई येथील बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये 14 टक्क्यांनी वाढ
वरिष्ठ पोलीस अधिकारी संदेश रेवाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील तीन अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री गायिका आहे. तसेच तिने सावधान इंडिया या कार्यक्रमात काम देखील केले आहे. तर, दुसऱ्या अभिनेत्री मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करते. तिसरी अभिनेत्री ही अल्पवयीन असून ती वेबसीरिजमध्ये काम करत आहे.