मुंबई (Mumbai Police) पोलिसांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena UBT) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), सुनील शिंदे (Sunil Shinde) आणि सचिन अहिर (Sachin Ahir) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ना. म. जोशी पोलीस ठाण्यामध्ये (NM Joshi Police Station) भारतीय दंड संहिता कलम 143, 149, 326 आणि 447 अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई येथील डिलाई रोड ब्रिज लेनचे उद्घाटक केले प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या सस्ते विभागाकडून याबाबत पोलिसांना तक्रार प्राप्त झाली होती.
मुंबई महापलिकाही कारवाईच्या भूमिकेत
मुंबई पोलिकेच्या रस्ते विभागाने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आदित्य ठाकरे, सुनील शिंदे आणि सचिन अहिर आणि त्यांच्या इतर कार्यकर्त्यांनी शासकीय कामात अडथळा आणला. तसेच, डीलाई रोड येथील दुसऱ्या लेनचे काम अपूर्ण असतानाही त्या कामाचे बेकायदेशीररित्या उद्घाटन केले. दरम्यान, आदित्य ठाकरे आणि त्यांच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी केलेल्या कृतीमुळे आता मुंबई महापलिकाही चांगलीच कारवाईच्या भूमिकेत आल्याचे पाहायला मिळत आहे.
आदित्य ठाकरे यांच्याकडून पूलाचे उद्घाटन
मुंबई महापालिका अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. डिलाई रोडवरील सर्व कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. येत्या सात दिवासांमध्ये ही कामे पूर्ण केली जाणार होती. त्यानंतर या लेनचे काम सुरु करण्याचे महापालिकेचे नियोजन होते. मात्र, नियोजित वेळापत्रक आमि उद्घाटनापूर्वी आदित्य ठाकरे यांनी या पूलाचे उद्घाटन केले आहे. परिणामी काम अपूर्ण असतानाच या रस्त्यावरुन वाहतूक सुरु झाली आहे.
एएनआय ट्विट
A case has been registered at NM Joshi Police Station against Uddhav Thackeray faction leader Aditya Thackeray, Sunil Shinde, and Sachin Ahir. The case has been registered under sections 143, 149, 326 and 447 of IPC: Mumbai police
More details awaited.
— ANI (@ANI) November 18, 2023
ठाकरे आणि शिंदे गटात संघर्ष
शिवसेना पक्षात एकनाथ शिंदे यांनी बंड करत भाजपसोबत हातमिळवणी केली आणि मुख्यमंत्री पदही मिळवले. त्यातच केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री शिंदे यांच्याच पारड्यात वजन टाकत शिवसेना हे नाव आणि निवडणुक चिन्ह असलेला धनुष्यबाण हे दोन्ही त्यांनाच बहाल केले. तेव्हापासून उद्धव ठाकरे यांची शिवसेना (UBT) आणि एकनाथ शिंदे यांचा पक्ष यांच्यात विविध कारणांवरुन संघर्ष पाहायला मिळतो आहे. कधी हा संघर्ष प्रशासकीय पातळीवर म्हणजेच कार्यक्रमांचे आयोजन, प्रकल्पांचे उद्घाटन अशा स्वरुपात पाहायला मिळतो आहे. तर दुसऱ्या बाजूला हा संघर्ष रस्त्यांवरही पाहायला मिळतो आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरही दोन्ही गटांमध्ये असाच संघर्ष पाहायला मिळाला. ज्यामध्ये पोलिसांनी महत्त्वाची भूमिका बजावत दोन्ही गटांना वेगळे केले आणि संभाव्य धोका टाळला. तरीही दोन्ही गटांमध्ये मोठ्या प्रमाणावर धक्काबुक्की झालीच. आता महापालिकेने दाखल केलेला गुन्हा आणि महापालिका कारवाई कोणते वळण घेते याबाबत उत्सुकता आहे.