Double Murder In Byculla: अवघ्या 15 मिनिटांत दोघांची हत्या, भायखळा येथून संशयीत सायको किलर पोलिसांच्या ताब्यात
Psycho Killer | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

मुंबईतील भायखळा (Byculla) परिसर एका धक्कादायक घटनेने हादरुन गेला. अवघ्या 15 मिनिटांच्या अंतराने या परिसरात फुटातवर झोपलेल्या दोन व्यक्तींच्या हत्या (Double Murder In Byculla) करण्यात आल्या. घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस (Mumbai Police) सतर्क झाले. त्यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या (CCTV Footage) आधारे सुरेश शंकर गौडा (Suresh Shankar Gauda) नामक व्यक्तीस केली आहे. त्याने कोणतेही कारण नसताना दोन व्यक्तींची हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. त्याने पहिल्यांदाच असे कृत्य केले आहे की, या आधीही अनेकांचा बळी घेतला आहे? याचा तपास पोलीस करत आहेत. शंकर गौडा हा सायको किलर असून या आधीही तो एका हत्या प्रकरणात तुरुंगात होता. मात्र, सबळ पुराव्याअभावी त्याची सुटका झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

प्राप्त माहितीनुसार, शंकर गौडा हा शनिवारी मध्यरात्री भायखळा येथे आला. त्याने जेजे मार्ग परिसरात फुटपाथवर झोपलेल्या दोघांची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. झोपलेल्या व्यक्तींच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक घालून त्याने या दोन्ही व्यक्तींचा बळी घेतला. केवळ 15 मिनिटांच्या आत त्याने फुटपाथवर झोपलेल्या दोन व्यक्तींचे प्राण घेतले. (हेही वाचा, धक्कादायक! अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात खतरनाक Serial Killer; हस्तमैथुन करत आतापर्यंत केली 93 महिलांची हत्या)

भायखळा येथील जेजे रोडवर झालेल्या दोन्ही हत्या या एकाच पद्धतीने करण्यात आल्या होत्या. त्यामुळे या दोन्ही हत्यांमागचा सूत्रधार हा एकच असावा असा पोलिसांना संशय होता. त्यामुळे पोलिसांनी तापासाचा धागा कायम ठेवत सूत्रे फिरवली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एका व्यक्तीस ताब्यात घेतले. सुरेश शंकर गौडा असे या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यावर केलेल्या चौकशीत 'आपण केवळ मनात आले म्हणून हत्या केली' असे सांगितले. आरोपीच्या जबाबानंतर पोलिसांनाही धक्का बसला.

दरम्यान, आरोपी सुरेश शंकर गौडा याने मुंबईतीलच कुर्ला परीसरात 2015 मध्येही एका व्यक्तीची हत्या केली होती. मात्र, त्या वेळी तो पूराव्याअभावी निर्दोश सुटला होता. 2016 मध्ये तो तुरुंगातून त्याची सुटका करण्यात आली. पाठिमागील काही वर्षांमध्ये फुटपाथवर झालेल्या विविध हत्यांमगेही सुरेश गौडा हाच कारणीभूत असावा असा पोलिसांना संशय आहे. त्या दृष्टीकोणातूनही पोलीस तपास करत आहे.