Court hammer (Representative Image)

अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Child Sexual Assault) प्रकरणात मुंबई येथील पोक्सो न्यायालयाने (Pocso Court) एका 50 वर्षीय इसमास 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. घटना घडली तेव्हा पीडिता अवघी नऊ वर्षांची होती. दोषी इसमाने तिच्यावर सार्वजनिक शौचालयात बलात्कार केला होता. पीडिता आणि साक्षीदारांचा जबाब ग्राह्य मानून कोर्टाने आोरपीस दोषी ठरवले आणि सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. कोर्टातील घटना सुमारे सात वर्षे चालला.

शौचालयात बलात्कार

विशेष सरकारी वकील गीता मालणकर यांच्या नेतृत्वाखालील सरकारी वकिलांनी पोक्सो कोर्टात दिलेली माहिती, प्रकरणाचा पोलीस तपास आणि साक्षी पुराव्यांमध्ये कोर्टात पुढे आलेल्या तपशीलानुसार ही घटना 7 सप्टेंबर 2029 मध्ये घडली. पीडिता ठरलेली अल्पवयीन मुलगी तिच्या घराजवळील सार्वजनिक शौचालयात गेली. आरोपीने मुलीला पुन्हा त्या शौचालयात आणले त्याने तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, शौचालयाच्या ब्लॉकजवळ संशयास्पद हालचाल आणि घटना पाहण्यास मिळालेल्या एका शेजाऱ्याने मुलीच्या आईस घटनेबाबत माहिती दिली. आई घटनास्थळी पोहोचली तेव्हा तिने आरोपीला शौचालयातून पळून जाताना पाहिले. आरोपीने केलेल्या कृत्यानंतर पीडितेला जबर मानसीत धक्का बसला. आईने केलेल्या चौकशीत पीडितेने आरोपीने केलेल्या कृत्याची माहिती दिली. (हेही वाचा, HC On POCSO Act: लैंगिक इच्छेशिवाय अल्पवयीन मुलीचे ओठ दाबणे, स्पर्श करणे आणि तिच्यासोबत झोपणे हा POCSO अंतर्गत गुन्हा नाही; दिल्ली उच्च न्यायालयाचे निरीक्षण)

पीडिता आणि साक्षीदारांचे जबाब ग्राह्य

घटनेमध्ये सरकारी वकील आणि पोलिसांची भूमिका महत्त्वाची राहीली. कोर्टाने प्रमुख साक्षीदार असलेली पीडिता आणि तिच्या आईच्या मनात विश्वास निर्माण केल्यानंतर त्यांनी घटनेबाबत तपशील दिला. पीडिता आणि साक्षीदाराचा जबाब ग्राह्य मानत कोर्टाने पीडितेच्या बाजूने निकाल देत आरोपीस सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. धक्कादायक म्हणजे आरोपीने पीडितेस आणि तिच्या आईस साक्ष फिरविण्यास आणि गप्प राहण्यासाठी आर्थिक आमिष दाखवले. तरीही पीडिता आणि आई आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने आरोपीने त्यांना जीवे मारण्याची आणि बदनामी करण्याची भीती दाखवली. त्याचीही दखल कोर्टाने घेतली असून, आरोपीस 20 वर्षांच्या सक्तमजुरीसोबतच 40 हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंडाची रक्कम वसूल झाल्यानंतर ती पीडितेस भरपाई म्हणून दिली जाईल. (हेही वाचा - Thane Daily Pocso Cases: धक्कादायक! ठाणे जिल्ह्यात प्रतिदिन एका पॉक्सो कायदा प्रकरणाची नोंद, एकट्या कल्याणमध्येच 25% पेक्षा अधिक घटना; वर्षभरातील आकडेवारी)

न्यायालयाने आपल्या निकालात गुन्ह्याचे गांभीर्य अधोरेखित केले आणि म्हटले की, आरोपींनी नऊ वर्षांच्या मुलीच्या असुरक्षिततेचा फायदा घेत, जबरदस्तीने आणि धमकी देऊन हे घृणास्पद कृत्य केले. मुलांविरुद्धच्या अशा गुन्ह्यांमुळे भविष्यात होणारे गुन्हे रोखण्यासाठी कठोर शिक्षेची आवश्यकता आहे. हा निकाल भारतातील बाल लैंगिक अत्याचाराला तोंड देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, जो पोक्सो कायद्यांतर्गत दोषींना शिक्षा मिळवून देण्यात पीडितांच्या साक्षीदारांच्या भूमिकेला बळकटी देतो. हा खटला सामुदायिक दक्षतेच्या महत्त्वावर देखील प्रकाश टाकतो, कारण शेजाऱ्याच्या वेळेवर सतर्कतेने आरोपीच्या अटकेत महत्त्वाची भूमिका बजावली.