प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-File Image)

मुंबईतील कबुतरांमुळे नागरिकांना दमा आणि त्वचारोग झाल्याचे दिसून आले आहे. तर कबुतरांची विष्ठा आणि पिस यांच्यामधून वाळलेल्या विष्ठेतून अस्परजिलस प्रकारची बुरशी निर्माण होऊन विविध प्रकारची अॅलर्जी किंवा धाप लागण्याचे प्रमाण वाढत चालले आहेत. तर कबुतरांची विष्ठा तशीच राहिली तर त्यामधून धोकादायक वायू निर्माण होत फुफ्पुसांचे संसर्ग वाढतात. असे एका तज्ञ डॉक्टरांनी सांगितले आहे.

तर कबुतरांच्या विष्ठेमुळे दोन महिलांची फुफ्फुसे निकामी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये एक 38 वर्षीय बोरिवली येथील महिला आणि 68 वर्षीय ब्रिज कॅन्डी येथे राहणाऱ्या महिलांचे सेन्ट्रल मुंबईतील एका रुग्णालयात फुफ्फुस प्रत्यारोपण पार पडले. याबाबत टाईम्स ऑफ इंडिया यांनी अधिक माहिती दिली आहे. तर यामधील एका महिलेची प्रकृती अती असंवेदनशील असून तिला हा फुफ्फुसाचा आजार वर्षभरापासून झाला आहे. तर या महिलेचे डॉक्टर उन्मिल शहा यांनी असे सांगितले की, कबुतरांनी बिल्डिंगच्या येथे टाकलेल्या विष्ठेसोबत संपर्क आल्याने हा आजार झाला आहे.(मुंबई मध्ये 27 जानेवारीपासून मॉल, उपहारगृह 24x7 सुरू ठेवण्यास परवानगी; पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा निर्णय)

तसेच बोरिवली येथे राहणारी महिला हेमाली शहा यांनी असे म्हटले आहे की, जेव्हा आम्ही नव्या घरात राहण्यास आलो तेव्हापासून श्वसनाचे आजार होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर माझी बहिण डॉक्टर असल्याने तिला याबाबात सांगितले असता श्वसनाचा विकार नसून कबुतरांच्या विष्ठेमुळे आजार होत असल्याने तिने सांगितले. या महिलेने परेल येथील ग्लोबल रुग्णालयात सप्टेंबर 20, 2019 मध्ये फुफ्फुस प्रत्यारोपण केले आहे.

तर भारतात प्रत्येक वर्षाला जवळजवळ दोन लाख प्रकरणे अशी आहेत ज्यामधून कबुतरांच्या विष्ठेमुळे फुफ्फुसाचे आजार झाल्याचे समोर आले आहे. मात्र फुफ्फुस प्रत्योरपण करणे ही शस्रक्रियाा अधिक गुंतागुंतीची असल्याचे तज्ञांकडून सांगण्यात आले आहे. गेल्या 34 महिन्यात ते आता पर्यंत 124 रुग्णांनी फुफ्फुस प्रत्यारोपण केले असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.