मुंबईत (Mumbai) उद्यापासून बेकायदेशीर गाडी पार्किंग केल्यास आता 15 हजार रुपयांपर्यंत दंडाची वसूली केली जाणार आहे. तर 1 मीटर अंतराच्या आतमध्ये गाडी पार्क केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. परंतु त्यासाठी विरोध करण्यात आला होता.
सध्या महापालिकेची जागा पार्किंगसाठी अपुरी पडत आहे. त्यामुळेच एक किमी अंतराच्या हद्दीबद्दल योग्य निर्णय घ्यावा अशी भुमिका शिवसेनेसह अन्य पक्षांनी मांडली होती. त्याचसोबत प्रशासनाला सुधारित प्रस्ताव आणण्याचे निर्देशन राजकीय पक्षांकडून देण्यात आले होते. मात्र अखेर उद्यापासून बेकायदेशीप पार्किंगवर चाप बसणार आहे. तर वाहनचालकांना या प्रकरणी 5 हजार ते 15 हजार रुपयांचा दंड लागू केला जाणार आहे.
मुंबईत 26 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये परेल, दादर आणि गोरेगाव अशा प्रमुख ठिकाणांची नावे आहे. तर 500 मीटरच्या आत गाडी पार्क केल्यास वाहतूक पोलिसांकडून तुमची गाडी त्या ठिकाणाहून टो केली जाणार आहे. त्याचसोबत 20 ऑड बेस्ट टेपोअसून त्याच्यासुद्धा 500 मीटर अंतराच्या आत गाडी पार्क केल्यास वाहनचालकास कारवाई केली जाणार आहे. (मुंबईत बेकायदेशीर पार्किंगसाठी लागू करण्यात येणारी 10 हजारांची दंड वसुली मागे)
महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी मुंबईत पार्किंगसाठी चालकांना शिस्त शिकवण्यासाठी एक निर्णय घेण्यात आला होता. त्यामध्ये एक किमी अंतराच्या आतमध्ये पार्किंग केल्यास दंड वसूली केली जाईल या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार होती. परंतु महापालिकेच्या या निर्णयाला विरोध करण्यात आला होता. मात्र आता 500 मीटर अंतराच्या आतमध्ये पार्किंग केल्यास कारवाई होणार आहे.