Mumbai: सध्या कोरोना व्हायरसच्या परिस्थितीमुळे अद्याप काही ठिकाणी पूर्णपणे शाळा सुरु करण्यात आलेल्या नाहीत. अशातच विद्यार्थ्यांना आता सुद्धा ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. परंतु काही खासगी शाळांनी शिक्षणाची फी सोबत अन्य शुल्क सुद्धा आकारले आहे. याच कारणास्तव आज मुंबईतील आझाद मैदानात खासगी शाळांच्या विरोधात पालक संघटनेकडून आंदोलन केले जात आहेत. याआधी सुद्धा हाच मुद्दा पालकांकडून उपस्थितीत करण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा पालकांनी हा मुद्दा उलचलून धरला असून आंदोलन करत आहेत.(Maharashtra Shocker: नागपूर मध्ये टीव्ही पाहण्यावरुन आईचा चढला पारा, 15 वर्षीय मुलीने गळफास लावून संपवले आयुष्य)
शालेय शिक्षण विभागाकडे खासगी शाळांकडून फीसह अन्य शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. परंतु त्यावर कोणतीही ठोस भुमिका घेण्यात आली नाही. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना सुद्धा याबद्दल सांगितले. पण दुर्लक्ष केले गेल्याने आता पालक आक्रमक झाले असून ते आज आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत.(Lockdown: महाराष्ट्रात पुन्हा कडक लॉकडाऊन लागणार? राजेश टोपे यांनी दिली महत्वाची माहिती)
दरम्यान, बहुतांश इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी शैक्षणिक फी भरावी यासाठी पालकांना सुचना दिल्या आहेत. तसेच त्या संबंधित माहिती पालकांना व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून सुद्धा दिली जात आहे. परंतु ज्यांनी फी भरली नाही त्यांना त्या ग्रुप मधून काढून टाकल्याचे ही काही पालकांनी म्हटले आहे. ऐवढेच नाही तर फी न भरल्यास विद्यार्थ्याला ऑनलाईन पद्धतीने शिकवल्या जाणाऱ्या अभ्यासाला सुद्धा बसता येणार नसे शाळांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पालकांनी शाळेच्या या मुजोर वागणूकीच्या विरोधात संताप व्यक्त करत शिक्षण विभागासह सरकारवर सुद्धा टीका करत आहेत.