कुत्र्याच्या सुविधेसाठी मालकाने चक्क बुक केले एअर इंडियाचे बिझनेस क्लास, ऐवढा आला खर्च
कुत्र्यासाठी बिमान बुक (Photo Credits-Wikimedia Commons)

कुत्रा हा सर्वांचा आवडते जनावर आहे. खरंतर त्याचे व्यक्तीसोबत असलेले नाते आणि प्रेम पाहता प्रत्येकाच्या मनाला ते हळवे करते. अशातच आता एका मालकाने आपल्या कुत्र्यासाठी संपूर्ण विमानाचे बिझनेस क्लास बुक केले. हे ऐकताना थोडे विचित्र वाटेल पण खरे आहे. कुत्र्याच्या मालकाने आपल्या प्रिय कुत्र्यासाठी मुंबई ते चेन्नई दरम्यान धावणाऱ्या फ्लाइटचे बिझनेस क्लास मधील सर्व सीट्स बुक केल्या.

कुत्र्याच्या मालकाने या दरम्यान दोन तासांच्या प्रवासाठी जवळजवळ 2.5 लाख रुपयांचा खर्च केला. अशी गोष्ट ज्या वेळी घडली तेव्हा देशाअंतर्गत उड्डाणे ही पूर्ण क्षमतेने भरली आहेत. या दरम्यान एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये बिझनेस क्लास मध्ये फक्त दोन व्यक्तींनी प्रवास केला. ते म्हणजे मालक आणि कुत्रा.(Shocking! महिलेच्या Bra मधून छोट्या पालीने पूर्ण केला जवळजवळ 6500 किमीचा प्रवास; जाणून घ्या काय घडले पुढे)

कुत्र्यासाठी ज्या विमानाच्या बिझनेस क्लासचे सीट्स बुकिंग केले होते त्याचे नाव A-671 आहे. आय-671 गेल्या बुधारी मुंबई ते चेन्नईसाठी रवाना झाले. सुत्रांच्या मते एअर इंडियाच्या A320 एअरक्राफ्ट मध्ये J-Class कॅबिनमध्ये एकूण 12 सीट्स होत्या. याच दरम्यान फक्त मालक आणि कुत्रा होता. तर मुंबई ते चेन्नई दरम्यानच्या एअर इंडियाच्या बिझनेस क्लासचे भाडे 20 हजार रुपये आहे. एअर इंडिया पॅसेंजर कॅबिनमध्ये पाळीव प्राण्यांना आपल्या सोबत घेऊन जाण्यास परवानगी देते. एअर इंडियाच्या नियमानुसार एका फ्लाइटमध्ये दोन लहान पाळीव जनावरे घेऊन जाऊ शकतो.