
Mumbai: महाराष्ट्रात कोरोनाचा नवा वेरियंट ओमिक्रॉनचे आतापर्यंत 108 प्रकरणे समोर आली आहेत. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येदरम्यान महापौर किशोरी पेडणेकर यांनी नागरिकांनी कोविडच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन पत्रकार परिषदेच्या वेळी केले आहे. त्याचसोबत ज्यांनी अद्याप लसीचे डोस घेतलेले नाहीत त्यांनी ते घ्यावेत असे ही त्यांनी म्हटले.(COVID 19 Guidelines For Ahmednagar: अहमदनगर मध्ये 'No Vaccine, No Entry' निर्बंध; सार्वजनिक ठिकाणी फिरण्यासाठी लस बंधनकारक)
किशोरी पेडणेकर यांनी पुढे असे ही म्हटले की, सरकारडून जाहीर करण्यात आलेल्या नियमांचे पालन करावे. 121 देशात ओमिक्रॉनचा धोका आहे. त्यामुळेच काही जणांना मृत्यू ही झाल्याची माहिती समोर आली होती. मार्केटमध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. यामुळे नागरिकांनी मास्क घालून बाहेर पडावे आणि सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे पालन करावे अशी विनंती पेडणेकर यांनी केली आहे.
त्याचसोबत क्लीनअप मार्शल संदर्भात महापौरांनी असे म्हटले की, जर नागरिकांनी नियम पाळल्यास त्यांची गरज नाही. असे झाल्यास त्यांना हटवले जाईल. मास्क आणि कोविडवरील लस हे कोरोनाच्या विरोधातील लढण्यासाठी मोठे हत्यार आहे.(Night Curfew In Maharashtra: महाराष्ट्रात आजपासून रात्री 9 ते पहाटे 6 वाजेपर्यंत जमावबंदी लागू; Omicron च्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सावधगिरीचे पाऊल)
महापालिका आता ऑनलाईन पेमेंट घेऊन येण्याचा विचार करत आहे. त्यानुसार मास्क न घातल्यास किंवा नियमाचे उल्लंघन केल्यास वसूल केला जाणाऱ्या दंडामुळे मार्शल आणि नागरिकांमध्ये वाद होतात. त्यामुळेच ऑनलाईन पेमेंटबद्दल विचार केला जात आहे. यावर 2-3 दिवसात काम करणार आहोत. तसेच मुख्यमंत्री ही सध्याच्या परिस्थितीवर नजर ठेवून आहेत.
ओमिक्रॉनला घाबरुन जावू नये तर त्याच्या विरोधात लढा असे ही किशोरी पेडणेकर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. नियमांचे पालन न केल्यास दंड स्विकारला जाईलच. तसेच ज्या नागरिकांनी लस घेतली आहे त्यांनी सुद्धा नियमाचे पालन करावे.