मुंबई: धारावीतील अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याला कोरोनाची लागण
Coronavirus in India (Photo Credits: IANS)

महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आहे. त्यामुळे पुणे आणि मुंबई हे रेड झोनमध्ये दाखल झाले आहेत. रेड आणि कंन्टेंटमेंट झोनमधील नागरिकांना लॉकडाउनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. तर मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे तेथे आता कोरोनाच्या संदर्भातील नियमांचे पालन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. धारावीत कोरोनाबाधितांचा आकडा 590 वर पोहचला आहे. तर आतपर्यंत 11 पेक्षा अधिक जणांचा बळी गेला आहे. कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याने त्यांच्यावर दिवसरात्र उपचार केले जात आहेत. तसेच पोलीस कर्मचारी सुद्धा अहोरात्र रस्त्यावर गस्त घालून आपले कर्तव्य बजावताना दिसून येत आहेत.(Alcohol Shops: औरंगाबाद मध्ये दारूविक्री सुरु केल्यास महिला रस्त्यावर उतरून दुकाने बंद करायला लावतील; खासदार इम्तियाझ जलील यांचा इशारा)

धारावी हा दाटीवाटीचा परिसर असून त्याला कंन्टेंटमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. या ठिकाणी महापालिकेकडून कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या परिसरातील नागरिकांची स्क्रिनिंगच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली होती. तसेच मुंबईतील दाटीवाटीच्या ठिकाणी ड्रोनची नजर राहणार असून लॉकडाउनच्या नियम अधिक कठोर होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. ('श्रमिक स्पेशल ट्रेन' ने प्रवास करणार्‍या कामगार, मजुरांकडून प्रवासभाडं आकारु नका; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची केंद्र सरकारला विनंती)

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 10 हजारांच्या पार गेला आहे. त्यामुळे आतातरी नागरिकांनी जागृक होऊन लॉकडाउनचे नियम काटेकोरपणे पाळावे. तसेच काही ठिकाणी आजपासून दारुची दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली आहे. परंतु त्यावेळी सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करावे असे सांगण्यात आले आहे. या नियमाचे पालन करत आता नागरिकांनी दारुच्या दुकानाबाहेर रांगा लावण्यास सुरुवात केली आहे.