Chief Minister Uddhav Thackeray

भारतामध्ये आजपासून लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. रेड, ऑरेंज, ग्रीन झोननुसार वर्गवारी करून आता हळूहळू लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता आणण्यात आली आहे. भारताच्या विविध भागामधून मजूर, पर्यटक, विद्यार्थी यांची ने-आण करण्यासाठी आता रेल्वेकडून 'श्रमिक स्पेशल ट्रेन' चालवली जात आहे. मात्र यासाठी मजुरांकडून तिकीट आकारलं जाऊ नये अशी विनंती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला केली आहे. परराज्यातील मजूर व कामगारांना लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर घरी जायला मिळते आहे. कोरोनामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे, याचा मानवतेच्या दृष्टीने विचार करून रेल्वेने त्यांच्याकडून तिकीट शुल्क आकारू नये अशी विनंती करण्यात आली आहे.

दरम्यान भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने मजूरांच्या प्रवासाचा तिकीट खर्च उचलण्याची तयारी दर्शवली आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी देशभरातील प्रदेश काँग्रेस कार्यालयांना एका पत्राद्वारे ही माहिती दिली आहे. Lockdow: काँग्रेस उचलणार 'श्रमिक स्पेशल ट्रेन'ने घरी परतणाऱ्या कामगार, श्रमिकांच्या रेल्वे तिकीटांच्या खर्चाचा भार.

CMO Tweet

भारतामध्ये 24 मार्च पासून कोरोना व्हायरस लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनमध्ये भारतात संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे अचानक लॉकडाऊन झाल्याने अनेक पर्यटक, विद्यार्थी अडकून पडले होते. कामधंदा बंद असल्याने अनेक मजूरांच्या हाती पैसा नाही. त्यामुळे रोजंदारीवर काम करणार्‍या अनेकांना आपल्या घरी परत जायचं आहे अशी मागणी सतत्याने पुढे येत होती. त्यानुसार आता रेल्वेने खास ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.