मुंबई (Mumbai) शहरातील साकिनाका (Sakinaka) नजिक असलेल्या चांदिवली (Chandivali) परिसरातील म्हाडा कॉलनी येथे येथे इमारतीची संरक्षण भिंत कोसळून घडलेल्या दुर्घटनेत एक जण ठार झाल्याचे वृत्त आहे. ही घटना शुक्रवारी (2 ऑगस्ट 2019) दुपारच्या सुमारास घडली. प्राप्त माहितीनुसार या घटनेत तीघे जण जखमी झाले आहेत. अग्ननिशमन दलाचे जवान आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, बचाव आणि मदत कार्य वेगाने सुरु आहे. जखमींना नजिकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मुंबई आणि उपनगरांमध्ये येत्या चोवीस तासात मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, आज (शुक्रवार) सकाळपासूनच ुमंबई आणि उपनगरांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. इमातीची भिंत कोसळण्याची ही पहिलीच घटना नाही. भिंत कोसळून नागरिकांचे प्राण गेले होते. या प्रकरणाने मुंबईतील धोकादायक इमारतींचा मुद्दा जोरदार चर्चेत आला होता. चांदिवली येथील घटनेनंतर आज पुन्हा एकदा हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. (हेही वाचा, मुंबई: चेंबूर येथे भिंत कोसळली, दोन रिक्षांचे नुकसान)
एएनआय ट्विट
IMD Mumbai: Intense spells of rain with gusty winds reaching 30-40 kmph likely to occur in the districts of Palghar, Thane, Raigad and Mumbai during next 4 hours.
— ANI (@ANI) August 2, 2019
दरम्यान, मालाड येथील राणी सती मार्गावर पोलिकेच्या जलाशयाची सुमारे 20 फूट उंचीची भिंत बाजूच्या झोपड्यांवर कोसळली होती. या घटनेतही एकदोन नव्हे तर, तब्बल 21 जणांचा जागीच मृत्यू झाला होता. मृतांमध्ये सात बालके, सहा महिला आणि उर्वरीत पुरुषांचा समावेश होता.
हवामान खात्याने ट्विट करत दिला मुसळधार पावसाचा इशारा
IMD Mumbai: Intense spells of rain with gusty winds reaching 30-40 kmph likely to occur in the districts of Palghar, Thane, Raigad and Mumbai during next 4 hours.
— ANI (@ANI) August 2, 2019
गेल्या प्रदीर्घ काळापासून मुंबईत भिंत, इमारत, पूल कोसळण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. एकादी घटना घडल्यानंतर त्यावर जोरदार चर्चा होते. मात्र, ती घटना घडून काही दिवस उलटल्यानंतर सर्व काही विसरले जाते. त्यावर फारसे कोणी भाष्य करत नाही. त्यामुळे अनेकदा धोकादायक इमारतींचा मुद्दा चर्चेत येतो आणि काळासोबत तो विसरलाही जातो. पालिकेने या मुद्द्याकडे आता गांभीर्याने पाहावे, अशी मागणी आता मुंबईकर नागरिक करु लागले आहेत.