Chembur Wall Collapsed (Photo Credits-ANI)

राज्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे 20 पेक्षा अधिक जणांना बळी गेला आहे. त्यात आता पुण्याची (Pune) घटना ताजी असताना मुंबईतील (Mumbai) चेंबूर (Chembur) येथे भिंत कोसळल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी दोन रिक्षांचे नुकसान झाली असल्याचे वृत्त समोर येत आहे.

मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास चेंबूर येथे भिंत कोसळ. या दुर्घटनेत दोन रिक्षांचे नुकसान झाले असून कोणतीही जिवतहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र कोसळलेल्या भिंतीचा ढिगारा उचलण्यासाठीचे काम सुरु करण्यात आले आहे. (पुणे: इमारतीची संरक्षक भिंत कच्च्या झोपड्यांवर पडली, 15 जणांनी गमावला जीव)

तर पुण्यात कोंढवा भागात इमारतीची भिंत कोसळून 15 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 4 मुलांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. तर पुण्यातील दुर्घटनेप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.