arrest

Mumbai News: मुंबईत एका ५६ वर्षीय महिलेला ओशिवरा पोलिसांनी अटक केली  आहे. अडीच वर्षांनी पतीची ३.६१ कोटी रुपयांची संपत्ती फसवणूक करून तिच्या नावावर हस्तांतरित केल्याप्रकरणी तीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, बृजेंद्रपाल क्षेत्रपाल सिंग, जो तक्रारदार आहे, त्याने पोलिसांना सांगितले की डिसेंबर 2019 ते डिसेंबर 2020 दरम्यान त्यांची तब्येत बरी नव्हती आणि त्यांच्या आजारपणाचा फायदा घेत त्यांची पत्नी रेणू ब्रिजेंद्रपाल सिंगने त्याला पॉवर ऑफ अॅटर्नी देण्यास भाग पाडले. .

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवकिरण अपार्टमेंट, लोखंडवाला कॉम्प्लेक्स, अंधेरी येथील रहिवासी सिंग यांनी पोलीसांत तक्रार केली की, त्यांच्या पत्नीने त्यांच्या बँकेचे सर्व हक्क, शेअर सिक्युरिटीज, गुंतवणूक, भागीदारी व्यवहार, जंगम आणि स्थावर मालमत्तेचे व्यवहार, कायदेशीर दावे आणि इतर करार मिळवले. सिंग यांच्या फसव्या सह्या घेण्यात आल्या आणि ३.६१ कोटी रुपयांची मालमत्ता आरोपीच्या नावे झाली.

फसवणुकीची माहिती मिळाल्यावर सिंग यांनी जानेवारी २०२१ मध्ये पोलिसांकडे तक्रार केली; मात्र आरोपी फरार झाला, नुकतेच अटक करण्यात पोलीसांना यश आले. यापूर्वी विविध न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात आले होते; मात्र, अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला. पोलिसांनी मालमत्तेची कागदपत्रेही ताब्यात घेतली आहेत. पुढील कारवाईसाठी पोलीसांचे प्रयत्न चालू आहे.