Mumbai News: मुंबईतील बोरिवली पूर्वेतील दत्त पाडा रोड, राजेंद्र नगर, डिस्कव्हरी बिल्डिंगजवळ झालेल्या अपघातात 37 वर्षीय ऑटो-रिक्षा चालकाचा मृत्यू झाला. पीडितेचा भाऊ निगाहे शेख यांनी दावा केला की, बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचारास उशीर झाल्यामुळे त्याचा भावाचा मृत्यू झाला आहे. हिदायत शेख याला जीव गमवणाऱ्या तरुणाचे नाव आहे. भरधान वाहनाने धडक दिल्यानंतर हा अपघात घडून आला. या घटनेअंतर्गत पोलिसांना वाहन चालकांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
कस्तुरबा पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरनुसार, मालाड पश्चिम येथील मनोकामना सोसायटीत राहणारा हिदायत शनिवारी पहाटे 5च्या सुमारास त्याच्या ऑटोरिक्षाने जात असताना रस्त्याच्या कडेला ऑटोरिक्षा दुरुस्त करत होता. मागून एका वेगवान वाहनाने त्याला धडक दिली. या धडकेत त्याचे हात, पाय, डोके आणि बरगड्यांना दुखापत झाली. तो शुद्धीवर असला तरी दुसऱ्या वाहनाचा चालक घटनास्थळावरून पळून गेला. एकाने त्याला मदतीचा हात देत त्याच्या मित्रांना कॉल केला.मित्र घटनास्थळी पोहचून त्याला तात्काळ रुग्णालायत दाखल करण्यात आले.
कांदिवली पश्चिम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती खालावली होती म्हणून डॉक्टरांनी त्यांना इमर्जन्सी वॉर्डमध्ये हलवले, डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली आणि सकाळी 10.30 वाजता त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर रुग्णालयात त्याचा भाऊ पोहचला. त्यावेळी रुग्णालयातील कर्मचारी त्याच्याशी उद्धटपणे वागले पीडितेला योग्य उपचार न दिल्याचा आरोप भावाने केला. पोलीसांनी या घटनेची नोंद घेत घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आहे. आरोपी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपीचा शोध सुरु आहे.