Mumbai News: शाळेच्या ऑनलाईन अर्ज देऊन फसवणूक केल्याची प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केले आहे. आरोपी मुळचे उत्तर प्रदेश येथे आहे. आरोपींनीं मलबार हिलमधील कॅम्पियन स्कूलमध्ये प्रवेशासाठी रु. 30,000 जमा केल्याचे समोर आले आणि गामदेवी पोलिस स्टेशनमध्ये नोंदवलेल्या प्रकरणात रु. 3.5 लाख रुपयांची फसवणूक केल्याची माहिती उघडकीस आली. (हेही वाचा- ऑनलाईन पेमेंट कंपनीची दोघांनी केली फसवणूक)
मिळालेल्या माहितीनुसार, विमल देव ठक्कर यांनी ऑनलाईन फसवणून झाल्याची तक्रार दाखल केली. त्यांची सून ( डॉक्टर ) यांनी त्यांच्या मुलाच्या स्कूल अॅडमिशनसाठी वेबसाईटवरून प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला होता.३ वर्षाच्या मुलासाठी कॅम्पियन स्कूल कुलाबा येथे प्रवेश घेण्यासाठी आॉनलाईन अर्ज सादर केला होता. ११ जानेवारीला मुलाखतीसाठी ईमेला मिळालं. ईमेल मध्ये कागदपत्रे आणि काही रक्कम भरण्यासाठी सांगितले आणि १५ दिवसांत कॉल येईल अशी माहिती दिली.
१७ जानेवारी रोजी ठक्कर यांना यांना कॅम्पियन स्कूलच्या प्रशासकीय विभागातून स्वामी फ्रान्सिस असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीचा फोन आला. मुलाच्या प्रवेशासाठी रु.3.5 लाख देणगी आणि ₹95,000 वार्षिक फीची मागणी केली. ठक्करने दिलेल्या बँक खात्यात साडेतीन लाख रुपये ट्रान्सफर केले. दुसऱ्या दिवशी, शाळेची माहिती आणि पाठपुरवा मिळवण्यासाठी फोन करण्याचा प्रयत्न केला पंरतु फोन बंद असल्याने संशय निर्माण झाला. त्यानंतर गामदेवी पोलिसांकडे तक्रार केली.
पोलिसांनी या घटनेअंतर्गत धर्मेंद्र कुमार शारदा प्रसाद (40), आशिष शुक्ला (21), आणि मेहफूज शेख (40) या संशयिताना फोन क्रमांकावरून अटक केले.या घटनेनंतर परिसरात एकत खळबळ उडाली. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहे.