नवी मुंबई आणि रायगड परिसरातील मुंबई लोकलचा महत्त्वकांशी अशा खारकोपर- उरण रेल्वे मार्गाचे काम पुर्ण झाले आहे. लवकरचं पंतप्रधानांच्या हस्ते या मार्गाचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे. या मार्गावरील रेल्वे स्थानकांच्या नावावरुन गोंधळ निर्माण झाला असून हा गोंधळ निस्तरण्यासाठी आता मध्यरेल्वेच्या अधिकाऱ्यांना मंत्रालयात फेऱ्या माराव्या लागत आहे. खारकोपर-उरण रेल्वे मार्गावर गव्हाण, रांजणपाडा, न्हावाशेवा, द्रोणागिरी आणि उरण अशी पाच स्थानके आहे. (हेही वाचा - Army constructs First Bridge: पुरानंतर उत्तर सिक्कीमला मुख्य भूभागाशी जोडण्यासाठी लष्कराने बांधला पहिला पूल)
रेल्वे स्थानकाचे नाव राज्य सरकारकडून सुचवण्यात आले आहे. या मध्ये द्रोणागिरी स्थानकाला बोकडवीरा या गावाचे नाव तर, उरण स्थानकाचे काळाधोंडा आणि रांजणपाडा स्थानकाला खेमटीखाड अशी नाव राज्य सरकारकडून मध्य रेल्वेकडे पाठवण्यात आले.
राज्य सरकारच्या प्रस्तावात उरण स्थानकाला काळाधोंडा गावाचे नाव दिले आहे. द्रोणागिरी नावाच्या स्टेशनला बोकडवीरा गावचे नाव तर रांजणपाडा स्थानकाला खेमटीखाड या नावाचा प्रस्ताव राज्य सरकारने दिला आहे. न्हावाशेवा स्थानकाचे नाव या प्रस्तावात नावेशेवा असे आहे. मात्र यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडू नये म्हणून मध्य रेल्वेने द्रोणागिरी आणि उरण स्थानकाचे नाव बदलले आहे.