Mumbai News: मुंबईतील दादर येथील प्राणी संग्रहालयातून प्राण्याची चोरी झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. पोलिस ठाण्यात या घटनेअंतर्गत अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राणी संग्रहालयातून ४.५५ लाख रुपये किमतीचे अजगर आणि सरडे यांसारखे प्राणी चोरीला गेले आहे. मागील दिवसांपासून प्राणी संग्रहालय हे वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या प्राणी संग्रहालातून काही जलप्राणी शेजारच्या तरण तलावात जात असल्याची तक्रार महापालिकेने दिली.
मरीन अक्वा प्राणी संग्रहालयाचे विश्वस्त पृथ्वीराज पवार यांनी मंगळवारी पाहिले की दोन बॉल अजगर, 2 रेड-टेल बोस, 1 कार्पेट पायथन, 1 ब्लू आयड ल्युसी, 2 अर्जेंटाइन, काळे आणि पांढरे तेगू सरडे, 1 विदेशी निळ्या-जीभेचा सरडा आणि 1 इगुआना प्राणीसंग्रहालयातून गायब होते.परिसरात शोध घेतला परंतू त्यांना कोणतेही प्राणी दिसून आले नाही, या घटनेची गंभीर बाब लक्षात घेता त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. चोरी झालेले प्राणी हे साडेचार लाख रुपयांपर्यत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
हे प्रकरण पोलिसांनी गंभीर घेऊन तपासणी सुरु केली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुध्दात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांना हा विषय प्राणी तस्करी असल्याचा संशय येत आहे. तक्रारीत म्हटल्याप्रमाणे, मंगळवारी सकाळी सोमया विद्याविहार कॅम्पस स्कुल येथे प्राणी प्रदर्शन होते, त्या साठी पवार हे झु प्राणी संग्रालय येथुन प्रदर्शनासाठी प्राणी घेऊन जाण्यासाठी सकाळी साडे सात वाजता आले असता तेथे असलेले ६ अजगर विदेशी प्रजातींचे, २ घोरपड विदेशी प्रजातींचे १ पाल विदेशी प्रजातीची, १ सरडा विदेशी प्रजातीचे प्राणी त्यांना कंपाउंडमध्ये दिसून आले नाहीत.