मुंबईच्या भायखळा येथील प्राणिसंग्रहालयात कोरोना व्हायरस (Corona Virus) साथीच्या आजारापूर्वीच्या 2019 च्या तुलनेत या दिवाळी (Diwali 2022) आठवड्यात 138 टक्के महसूल वाढला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आकडेवारीनुसार, वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान (Veermata Jijabai Bhosale Park) किंवा भायखळा प्राणीसंग्रहालयाने (Byculla Zoo) 22 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर दरम्यान 34.95 लाख रुपयांची कमाई केली. त्या तुलनेत 2019 च्या दिवाळी आठवड्यात 25 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर, प्राणीसंग्रहालयाने 14.70 लाख रुपयांचा महसूल जमा केला होता. प्राणिसंग्रहालय अभ्यागतांसाठी खुले करण्यात आलेली महामारी-प्रेरित लॉकडाऊन नंतरची पहिली दिवाळी होती.
9 मार्च रोजी राज्यात कोविड-19 ची पहिली दोन प्रकरणे नोंदवल्यानंतर प्राणीसंग्रहालय प्रथम 15 मार्च 2020 रोजी बंद झाले. ते 11 महिन्यांनंतर, 13 फेब्रुवारी 2021 रोजी पुन्हा उघडले, परंतु BMC द्वारे 5 एप्रिल रोजी अभ्यागतांसाठी बंद करण्यात आले. गेल्या वर्षीच्या दिवाळीनंतर 1 नोव्हेंबर 2021 रोजी ते पुन्हा उघडण्यात आले आणि तेव्हापासून ते उघडे आहे. हेही वाचा जालना मध्ये जांब समर्थ मधील रामदास स्वामींच्या देवघरातील मूर्ती चोरीप्रकरणी 2 जणांना अटक; मुख्य आरोपी अद्यापही फरार
प्राणीसंग्रहालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, प्राणीसंग्रहालयात यावर्षी विशेषत: सणासुदीच्या दिवशी प्रचंड गर्दी झाली आहे. गुरुवारी, आम्हाला गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी गेटच्या बाहेर पोलिस व्हॅनची विनंती करावी लागली, कारण प्राणीसंग्रहालय बंद आहे परंतु तरीही लोक बाहेर जमतात. यावर्षी 1 जानेवारी ते 26 ऑक्टोबर दरम्यान, प्राणिसंग्रहालयाने 6.87 कोटी रुपयांचा महसूल गोळा केला आहे.
जो 2019 च्या संपूर्ण महामारीपूर्व वर्षात जमा झालेल्या 4.47 कोटी रुपयांपेक्षा 53 टक्के अधिक आहे. दिवाळीसारख्या सुट्ट्यांमध्ये प्राणीसंग्रहालयाचा महसूल शिखरावर असतो. ख्रिसमस, आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे अभ्यागत वाढले आहेत. 2022 च्या उन्हाळ्याच्या महिन्यांत (मे-जून) प्राणीसंग्रहालयाने एकूण 2.34 कोटी रुपयांची कमाई केली.
आजपर्यंतच्या कमाईच्या 34 टक्के. 2019 च्या याच कालावधीत (उन्हाळ्यात) 1.02 कोटी रुपये कमावले. प्राणिसंग्रहालयाने त्या वर्षी मिळवलेल्या वार्षिक कमाईच्या हे प्रमाण 23 टक्के होते. BMC प्रौढांसाठी 50 रुपये आणि मुलांसाठी 25 रुपये प्रवेश शुल्क आकारते.