मुंबईत एका 27 वर्षीय डॉक्टरने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. शिवडी येथील टीबी हॉस्पिटलमध्ये एका डॉक्टरने इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. आदिनाथ पाटील असं या डॉक्टरचं नाव आहे. केईएम रुग्णालयात हे निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत होते. आदिनाथ हा जळगावचा विद्यार्थी होता. मेडिकल कॉलेजच्या पहिल्या वर्षाला तो होता. आदिनाथ पाटील यांचे वडिल हे देखील डॉक्टर आहे. केईएम रुग्णालयाचे मेडिसीन विभाग हे दुरस्तीच्या कामामुळे शिवडी येथे शिफ्ट करण्यात आले आहे. (हेही वाचा - Mumbai Crime: खारमध्ये भररस्त्यात पतीचा पत्नीवर चाकूने हल्ला, आरोपी फरार)
आदीनाथ पाटील यांनी शिवडीच्या टीबी रुग्णालयात इजेंक्शन टोचुन घेत स्वत:चे आत्महत्या केली आहे. केईएम रुग्णालयातील मेडिसीन विभाग शिवडीच्या टीबी रुग्णालयात शिफ्ट केल्यामुळे निवासी डॉक्टरांना मोठा मनस्ताप हा सहन करावा लागत होता. आदिनाथ पाटीलने टीबी रुग्णालयात रात्रीच्या वेळेस इंजेक्शन घेत आयुष्य संपवलं आहे. त्याच्या जाण्याने कुटुंबियांना धक्का बसला आहे. मात्र त्याने असं पाऊल का उचललं, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. या शोध पोलीस करत आहे.
शिवडी रुग्णालयात सोयीसुविधा अभाव असल्याने अनेक निवासी डॉक्टरांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे डॉक्टराने नैराश्यात जाऊन अशा घटना घडत आहे. याकडे रुग्णालय प्रशासनाने गांर्भीयाने लक्ष देणे गरजेचे आहे. दरम्यान या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.