Mumbai Crime: खारमध्ये भररस्त्यात पतीचा पत्नीवर चाकूने हल्ला, आरोपी फरार
या दोघांचं वैवाहिक आयुष्य फारसं सुरळीत नव्हतं. नेहमीच या दोघांमध्ये छोट्या मोठ्या गोष्टीवरुन वाद हा होत होता.
मुंबईच्या (Mumbai) खारमध्ये (Khar) पतीने पत्नीवर भररस्त्यात चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या चाकू हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून तिला जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. तर हल्ला केल्यानंतर आरोपी पती घटनास्थळावरुन पसार झाला. काल रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. हे जोडपे धारावी (Dharavi) मधले रहिवासी आहेत. या दोघांचं वैवाहिक आयुष्य फारसं सुरळीत नव्हतं. नेहमीच या दोघांमध्ये छोट्या मोठ्या गोष्टीवरुन वाद हा होत होता.तसेच त्याचा हा वाद न्यायालयात देखील सुरु असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. दरम्यान या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. (हेही वाचा - Jaipur Mumbai Train मध्ये Firing नेमकं कसं घडलं? जाणून घ्या थरार)
धारावीच्या शाहू नगर परिसरातून हे जोडपे खार इथे फिरायला गेले असता त्यांच्यात पुन्हा भांडण झालं. दोघांमधील वादावादी वाढली. रात्री साडेआठच्या सुमारास ते दोघे 14 व्या रोडवर होते, त्यावेळी पतीने त्याच्याजवळ असलेल्या पेपर कटरने पत्नीवर हल्ला केला आणि तिच्या गळ्यावर वार केले. यानंतर तो तिला रक्तबंबाळ सोडून पळून गेला. घटनेची माहिती मिळताच खार पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमी महिलेला उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखलं केलं. सध्या तिच्यावर उपचार सुरु असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान पोलीस सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून पतीकडे चाकू नेमका कुठून आला हा गुन्हा रागाच्या भरात घडला की पत्नीची हत्या करण्याचा त्याचा पुर्वनियोजीत कट होता या अनुषंगाने पोलीस आता चौकशी करत आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jul 31, 2023 01:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

