Jaipur Mumbai Train (Photo Credit - PTI)

जयपूर मुंबई एक्सप्रेस ट्रेन क्रमांक 129556 मध्ये सोमवारी (31 जुलै) पहाटे घडलेल्या भीषण गोळीबारामुळे रेल्वे प्रशासन आणि प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. काय, घडलं, कसं घडलं, आरोपी कोण, किती ठार अशा एक ना अनेक प्रश्नांनी काहूर उठवलं. या घटनेनंतर गोळीबार घडलेली ही ट्रेन मुंबई सेंट्रल स्थानकात आणण्यात आली. पोलिस आणि रेल्वे प्रशासनाने गोळीबार झालेल्या रेल्वे बोगीचा (बी-5) तातडीने ताबा घेतला आणि प्राथमिक माहिती पुढे आली. ज्यात धक्कादायक घटनेचा काहीसा उलघडा झाला आहे.

घटनेबाबत प्राथमिक माहिती अशी की, रेल्वे पोलीस दलातील कॉन्टेबल असलेल्या चेतन सिंह हा प्रमुख आरोपी आहे. त्यानेच हा गोळीबार केला. त्याने केलेल्या गोळीबारात तीन प्रवाशांसह रेल्वे पोलीस दलातील कॉन्स्टेबल चेतन सिंह असा चौघांचा मृत्यू झाला. ट्रेन दहीसर स्थानकात पोहोचतात आरोपीने गाडीची चेन खेचली. गाडीचा वेग कमी होताच आरोपीने पलान करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला शताफीने पकडले. त्याला रिवॉल्वरसह पकडण्यात यश आले.

व्हिडिओ

जयपूर मुंबई एक्सप्रेस ट्रेनमधील बोगीचे एसी कोच अटेंडंट कृष्णकुमार शुक्ला यांनी यांनी नेमकं काय घडलं याचा आखों देखा हाल सांगीतला, ते म्हणाले पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास आम्ही बोगीतून गोळीबाराचा आवाज ऐकला. मी तातडीने एसी कोचच्या दिशेने गेलो. काही लोक रक्ताच्या थारोळ्यात खाली पडल्याचे दिसत होते. पोलीस काँस्टेबल चेतन सिंह हातात रिव्हॉल्वर घेऊन बोगीत फिरत होता. इतर प्रवासी भेदरले होते. ASI साहेब देखील खाली पडले होते. कोणाला काहीच कळत नव्हते. कॉन्टेबल दहशत माजवत बोगीत फिरत होता. त्यामुळे आम्हीही लांबूनच हा प्रकार पाहात होतो.

व्हिडिओ

दरम्यान, आरपीएफ जवानांनी गोळीबार केल्याचा आरोप असलेल्या काँस्टेबलला बोरीवलीा आणण्यात आले आहे. त्याच्याकडे चौकशी सुरु आहे. दरम्यान, बोगीतील चारही मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून उत्तरीय तपासणीसाठी ते शताब्दी रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. मानसीक ताणातून आरपीएफ कॉन्टेबलने गोळीबार केला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.