Molestation | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Mumbai News: एका ६३ वर्षीय महिलेने तिच्या ६८ वर्षीय पतीविरुद्ध आयपीसी कायद्याच्या कलम ४९८-ए अंतर्गत क्रूरता आणि अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. महिलेचा पती तिला रोज मारहाण करायचा असं तीने तक्रार पोलिसांत दिली. वृध्द जोडपं दहिसर येथील रहिवासी आहे. तक्रारीत दिल्या प्रकरणी पतीने १४ वर्षापूर्वी नोकरीचा राजीनामा दिला होता. यांना तीन मुले असल्याची माहिती दिली आहे. पती दररोज दारू पियायचा.तीला मारहाण करायचा तर काही वेळा घटस्फोट करण्याची धमकी सुध्दा द्यायचा.

मिळालेल्या माहितीनुसार, दहिसर येथील या वृध्द जोडप्याचं नेहमी भांडण होत असायचा. पती महिलेवर अत्याचार करायाच. महिलेला शंका होती की तिच्या पतीचे एका 36 वर्षीय महिलेशी प्रेमसंबंध होते कारण तो त्या महिलेशी अनेक तास बोलत असे. पतीने फिर्यादीला शिवीगाळ केली, मारहाण केली आणि दुसऱ्या महिलेसोबतच्या प्रेमसंबंधाबद्दल विचारले असता घटस्फोट देण्याची धमकी दिली. त्यांच्या मुलांनी वडिलांना समजावण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी कोणाचेच ऐकले नाही.

तक्रारदार महिला आपल्या मुलीच्या घरी गेली, त्यावेळी तिच्या पतीने चावी बनवणाऱ्याला फोन करून कपाटाची दुसरी चावी बनवली आणि बँकेच्या लॉकरची चावी घेतली. बँकेत तिने ५० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने ठेवले होते. पतीने तिला बँकेच्या लॉकरची चावी देण्यास नकार दिल्याने सर्व सोन्याचे दागिने त्याने मिळवले असा तिला[Poll ID="null" title="undefined"] संशय होता. तिने बँकेच्या लॉकरची चावी मागितली असता, तिच्या पतीने तिला शिवीगाळ केली आणि मारहाणही केली. अखेर तिने पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला.