Mumbai News: अॅक्टिव्हा आणि ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू, गोरेगाव येथे अपघात
Accident (PC - File Photo)

 Mumbai News: दिवसेंदिवस रस्ते अपघाताची मालिका वाढत चालली आहे. दरम्यान मुंबईतील गोरेगाव पूर्व येथे मंगळवारी रस्ता अपघातात ५८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. अॅक्टिव्हा स्कूटर आणि ट्रकच्या धडकेत हा अपघात झाला. या घटनेअंतर्गत पोलिसांनी ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृत महिला आपल्या मुलासोबत अॅक्टिव्हाने जात हा घात झाला. मृत महिला आपल्या कुटुंबासोबत जोगेश्वरी येथील मजासवाडीतील रहिवासी होती.

मीडिया रिपोर्टनुसार, महिला आपल्या आपल्या मुलासोबत पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या दिशेने जात असताना उजव्या बाजूने भरधाव वेगात आलेल्या ट्रकने अॅक्टिव्हाला धडक दिली. या धडकेत  महिला खाली पडली. तीच्या डोक्याला आणि कानाला गंभीर दुखापत झाली. तीला तात्काळ जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयता नेले. उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी आरोप ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला.

पोलिसांच्या मदतीने ट्रक चालकाला तात्काळ पकडण्यात आले. त्याला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ट्रकचालक कामरान खान (२९) याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि मोटार वाहन कायद्यांतर्गत बेदरकारपणे वाहन चालवून अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करून नंतर जामिनावर सोडण्यात आले. अशी माहिती माध्यम सुत्रांकडून मिळाली आहे.