मुंबई: नवजात स्त्री अर्भकाचा 21 व्या मजल्यावरुन फेकल्याने मृत्यू; कांदिवली  येथील लालजी पाडा परिसरातील घटना
Newborn | (Images for symbolic purposes only । Photo Credits: pixabay)

एका नवजात स्त्री अर्भकाला इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन खाली फेकल्याची धक्कादायक घटना मुंबई (Kandivali) येथे घडली आहे. मुंबईतील कांदिवली (Kandivali) येथील लालजी पाडा (Lalji Pada परिसरात असलेल्या जय भारत कॉम्पलेक्स (Jai Bharat Complex) या इमारतीत ही घटना गुरुवारी (5 डिसेंबर 2019) घडली. काही प्रसारमाध्यमांनी दावा केला आहे की, या अर्भकाच इमारतीच्या 21 व्या मजल्यावर खाली फेकले. तर काहींनी म्हटले आहे की, 17 व्या मजल्यावरुन फेकले. उंचावरुन जमीनीवर आपल्याने अर्भकाचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटाना घडलेली इमारत बहुमजली आहे. एका अज्ञात व्यक्तीने हे अर्भक इमारतीच्या वरच्या कोणत्यातरी मजल्यावरुन फेकले. हे अर्भक नेमके कोणत्या मजल्यारुन फेकले याबाबत ठोस माहिती अद्याप मिळू शकली नाही. पोलीस या घटनेचा तपास करत आहे. मात्र, प्राथमिक माहिती अशी की, बाथरुमच्या खीडकीतून हे अर्भक खाली फेकण्यात आले.  (हेही वाचा, धक्कादायक! गर्भापात करुन 5 महिन्याचे अर्भक नदीत फेकले; अनैतिक संबधातून कुमारी मातेने नवजात बाळाला जन्म दिल्याची शक्यता)

इमारतीच्या सुरक्षारक्षकाने या अर्भकाता मृतदेह पाहिला आणि घडला प्रकार पुढे आला. सुरक्षारक्षकाने या घटनेची माहिती इमारतीमधील इतर लोकांना लागलीच दिली. त्यानंतरत इमारतीतील नागरिकांनी घडल्या प्रकाराची माहिती पोलिसांनाही दिली. प्राप्त माहितीवरुन पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी प्रकरणाची दखल घेतली असून, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत असून, स्थानिक नागरिकांची चौकशीही करत आहेत.