नवीन वर्षाच्या (New Year 2024) स्वागतासाठी मुंबई (Mumbai) नगरी सज्ज होत आहे. ठिकठिकाणी नववर्षाच्या सेलिब्रेशनची तयारी सुरू असलेली दिसत आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला शहरात 22 पोलीस उपायुक्त, 45 सहायक पोलीस आयुक्त, 2,051 पोलीस अधिकारी आणि 11,500 हवालदार तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय, राज्य राखीव पोलीस दल (SRPF) पलटण, क्विक रिस्पॉन्स टीम (QRT), आरकीपी सुरक्षा सेवा आणि होमगार्ड्स नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला संपूर्ण मुंबईत तैनात असतील.
मुंबईत ठिकठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदीही केली जाणार आहे. गर्दीच्या ठिकाणी पोलीस गस्त घालतील आणि सुरक्षेवर लक्ष ठेवण्यासाठी चौक्या उभारतील. मुंबई पोलीस 2023 च्या शेवटच्या दिवशी विशेष मोहीम राबवणार आहेत, ज्यात हिट-अँड-ड्राइव्हच्या घटना रोखणे आणि वाहतूक नियमांची अंमलबजावणी करणे यावर लक्ष केंद्रित केले जाईल. शिवाय, मुंबई पोलीस समाजकंटक आणि समाजविघातक कृत्यांमध्ये गुंतलेल्या संघटनांचा तपास करतील.
मुंबई पोलिसांनी दारूच्या नशेत वाहन चालवणे, सार्वजनिक ठिकाणी उपद्रव निर्माण करणे, महिलांची छेडछाड करणे आणि ड्रग्ज विकणे, खरेदी करणे, बाळगणे आणि सेवन करणे अशा गुन्ह्यांमधील व्यक्तींसाठी शून्य सहनशीलता घोषित केली आहे. मुंबईतील नागरिकांनी नियमांचे पालन करत नवीन वर्षाचे उत्साहात आणि उत्साहाने स्वागत करावे, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे. (हेही वाचा: Mahalaxmi Saras Exhibition: फूड कोर्टवर खवय्यांनी गर्दी, अनेक सांस्कृतिक-मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन; जाणून घ्या मुंबईमधील लोकप्रिय 'महालक्ष्मी सरस प्रदर्शना'चे स्वरूप)
नागरिकांना नववर्षाचे स्वागत सुरक्षितपणे करता यावे म्हणून मुंबई पोलीस दलाकडून २२ पोलीस उप आयुक्त, ४५ सहायक पोलीस आयुक्त, २०५१ पोलीस अधिकारी, ११५०० पोलीस अंमलदार तसेच एसआरपीएफ प्लाटून , क्यूआरटी. टीम, आरसीपी, होमगार्ड बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.
तरी सर्व नागरिकांनी…
— मुंबई पोलीस - Mumbai Police (@MumbaiPolice) December 29, 2023
याबाबत सत्यनारायण चौधरी, सह पोलीस आयुक्त, कायदा आणि सुव्यवस्था, मुंबई यांनी सांगितले, ‘31 डिसेंबरसाठी आम्ही मुंबई शहरात विस्तृत सुरक्षा व्यवस्था केली आहे. आमचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी सर्व महत्त्वाच्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. 2,000 हून अधिक पोलीस अधिकारी आणि त्यासाठी सुमारे 13,000 पोलीस तैनात केले जातील. त्याशिवाय, आमच्या सर्व महत्त्वाच्या ठिकाणांना आमच्या सीसीटीव्हीद्वारे कव्हर केले जाईल. आम्ही हॉटेल मालकांना विनंती केली आहे की, त्यांनी सरकारी आदेश किंवा मुंबई पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे.’
दुसरीकडे, मीरा-भाईंदर-वसई विरार (MBVV) पोलिसांनीही रविवारी नवीन वर्षाचा उत्सव शांततेत पार पडावा यासाठी कंबर कसली आहे. 285 ट्रॅफिक वॉर्डन आणि 400 हून अधिक महाराष्ट्र सुरक्षा दल (MSF) यांच्या सहकार्याने वरिष्ठ अधिकार्यांसह सुमारे 940 पोलीस कर्मचारी कोणतीही अनुचित घटना घडू नयेत यासाठी गस्त घालणार आहेत. विस्तृत सुरक्षा व्यवस्थेचा एक भाग म्हणून दंगल नियंत्रण पोलीस (आरसीपी) च्या दोन पथकांना देखील सामील करण्यात आले आहे.