Dam | Image used for representational purpose | (Photo Credits: ANI Twitter)

एकीकडे मुंबईसह महाराष्ट्रामध्ये उन्हाचा कडाका वाढत आहे. त्यामध्ये मुंबईकरांना पाणीपुरवठा (Water Stock) करणार्‍या धरणांमध्येही पाण्याच्या पातळीने तळ गाठल्याने आता मुंबईकरांना पाणी जपूनच वापरण्याची वेळ आली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार मुंबईच्या धरणांमध्ये अवघा 26% पाणीपुरवठा राहिला असून हा एप्रिल महिन्यातील मागील दोन वर्षांतील नीच्चांक आहे.

मुंबईतील सद्यस्थितीतील पाणीसाठ्यावर मुंबईकर पुढील काही महिने काढू शकतील मात्र स्कायमेट्सने काही दिवसांपूर्वी वर्तवलेल्या अंदाजानुसार यावर्षी अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्यास मुंबईकरांची पाण्याची चिंता वाढणार आहे. Panvel मध्ये उद्यापासून पाणी कपात,एकदिवस आड पाणी मिळणार

 

मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणं

मुंबईकरांना सात धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. यामध्ये भातसा, वैतरणा, तुलसी,विहार, तानसा,अप्पर वैतरणा आणि मोडकसागर या धरणांचा समावेश आहे. सध्या या सातही धरणांमध्ये सुमारे 3.74 लाख मिलियन लीटर पाणी उपलब्ध आहे. मागील वर्षी एप्रिल महिन्यात हा पुरवठा 5.59लाख मिलियन लीटर इतका होता.

नोव्हेंबर 2018 पासूनच मुंबई शहरामध्ये 10% पाणीकपात सुरू करण्यात आली आहे. तर पाणी पुरवठ्याच्या वेळातही 15% कपात करण्यात आली आहे.