Panvel मध्ये उद्यापासून पाणी कपात,एकदिवस आड पाणी मिळणार

येत्या जून महिन्यापर्यंत पनवेलकरांना पाण्याचा पुरवठा होण्यासाठी महानगरपालिकेने उद्या 13 डिसेंबर पासून पनवेलमध्ये पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे.

Panvel मध्ये उद्यापासून पाणी कपात,एकदिवस आड पाणी मिळणार
पाणी कपात Photo credit: Wiki Commons

येत्या जून महिन्यापर्यंत पनवेलकरांना पाण्याचा पुरवठा होण्यासाठी महानगरपालिकेने उद्या  13 डिसेंबर पासून पनवेलमध्ये पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकदिवस आड पाणी येणार असल्याची ही सूचना पनवेलकरांना आधीच देण्यात आली आहे.

पनवेलला पाणीपुरवठा हा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, MIDC आणि देहरंग धरणामधून करण्यात येतो. तसेच पाताळगंगा नदीवर प्रत्येक रविवारी आणि सोमवारी इलेक्ट्रिक चालू-बंद केली जाते. त्यामुळे देहरंग धरणामधून पनवेलकरांना पाण्याचा पुरवठा केला जातो.

मात्र देहरंग धरणातील पाणीसाठी कमी झाला आहे. म्हणून महापालिकेने येत्या जून पर्यंत पाणीसाठा नागरिकांच्या पुरवठ्यास येण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Dec 12, 2018 03:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).