मुंबई: राज्य सरकार एअर इंडियाची इमारत खरेदी करण्याच्या तयारीत, सरकारी कार्यालये हलवण्यात येणार
Air India Building (Photo Credits-Twitter)

कर्जबाजारी झालेली आणि सध्या तोट्यात चाललेली एअर इंडिया(Air India) कंपनीची मुंबईतील मुख्य इमारत महाराष्ट्र सरकार खरेदी करण्याच्या विचारात करत आहे. त्यासाठी त्यांनी 1400 कोटी रुपयांची बोली लगावली असून त्याबद्दल आता तयारी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे या इमारती मधील सरकारी कार्यालये हलवण्यात येणार असल्याची शक्यता आहे.

एअर इंडियाची इमारत खरेदीसाठी जेएनपीटी (GNPT) यांनी 1375 कोटी आणि एलआयसीने (LIC) 1200 कोटी रुपयांची बोली लावली होती. परंतु राज्य सरकारने त्यापेक्षा अधिक बोली लगावत 1400 कोटी रुपयांत खरेदी करणार असल्याचे म्हटले आहे. तर महाराष्ट्राच्या प्रशासनाचे सर्व विभागाचे कामकाज एकाच इमारतीत व्हावा असा राज्य सरकारचा विचार आहे. असे केल्यास सरकारी विभागातील सर्व कारभारात पारदर्शकता येऊन काम अधिक वेगाने होईल असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सरकारी कार्यालये हलवण्यात येणार असल्याची शक्यता आहे असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.(मुंबई: एअर इंडिया ची इमारत खरेदी करु शकते महाराष्ट्र सरकार, 1400 करोड रुपयांची लावली बोली)

सध्या कंपनीकडे 22 वा मजला आणि तळ मजला आहे. तर उर्वरित इमारतीमधील मजले भाडेतत्वार दिले आहेत. मात्र राज्य सरकारने ही इमारत खरेदी केल्यास सर्व सरकारी कारभार एकाच इमारतीमधून पार पडेल या अपेक्षेने निर्णय घेतला जात आहे.