Payal Tadavi Suicide Case (Photo Credits: Twitter/ANI)

मुंबईच्या नायर हॉस्पिटल्समध्ये (Nair Hospital) शिकाऊ डॉक्टर पायल तडवी हीच्या आत्महत्येला कारणीभूत असणार्‍या या तीन आरोपी महिला सिनियर डॉक्टरर्स यांना अटकेनंतर आज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने भक्ती मेहेर (Bhakti Mehre), डॉ हेमा अहुजा (Hema Ahuja) आणि डॉ अंकिता खंडेलवाल (Ankita Khandelwal) या तिन्ही महिला डॉक्टर्सना 31 मे पर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे. काल रात्रीपर्यंत दोघींना तर सकाळी अंकिता खंडेलवाल या महिला डॉक्टरला मुंबईमध्ये अटक झाली होती.  Dr. Payal Tadvi Suicide Case: नायर हॉस्पिटलची मान्यता रद्द करा - तडवी कुटुंबीयांची मागणी

ANI Tweet

26 वर्षीय पायल तडवीने 22 मे दिवशी सिनियर डॉक्टर्सकडून जातीवाचक शेरेबाजीला कंटाळून गळफास घेत आपलं जीवन संपवलं. असा आरोप तडवी कुटुंबीय आणि पायलच्या पतीने केला आहे. काल (28 मे) दिवशी तडवी समाज आणि तिच्या कुटुंबीयांनी नायर हॉस्पिटल परिसरात निषेध केला.