मुंबई-नागपूर बाळासाहेब ठाकरे समृद्धी एक्सप्रेस वे येत्या दोन महिन्यात वाहतूकीसाठी सुरु केला जाणार आहे. याबद्दल शहर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे. एकनाथ शिंदे हे MSRDC चे सुद्धा अध्यक्षता करत आहेत.(Buldhana Road Accident: पंढरपूर वरून परतणार्या भाविकांच्या टेम्पो ला अपघात; 15 जण गंभीर जखमी)
महाराष्ट्र सरकारने गेल्या महिन्यात MSRDC चे प्रबंध निर्देशक आर मोप्पलवार यांना आणखी सहा महिन्यांचा कालावधी दिली असून ते या प्रोजेक्टवर काम करत आहेत. बुधवारी लोकमत इंफ्रा कॉन्क्वेव मध्ये बोलताना शिंदे यांनी विस्तारीतपणे सांगत म्हटले, कशा पद्धतीने सरकार कनेक्टिव्हिटीला उत्तम करण्यासाठी आणि व्यावसायिक वाढ करण्यासाठी रोडवेजचे नेटवर्क तयार करत आहेत.(Mahaparinirvan Din: दादर रेल्वे स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे; स्थानकाबाहेर भीम आर्मीचे आंदोलन)
तसेच शिंदे यांनी पुढे म्हटले की, सध्या पर्यावरण एक महत्वपूर्ण घटना असल्याने त्यांनी या मार्गाच्या माध्यमातून एक ग्रीन झोन तयार केले आहे. तर मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक सप्टेंबर-ऑक्टोंबर 2023 पर्यंत सुरु होणार आहे. त्याचसोबत किनारपट्टी रस्ते योजनेचा सुद्धा उल्लेख करत म्हटले की, तो सुद्धा 2023 पर्यंत सुरु होईल. या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व जिल्हे एकमेकांना जोडण्यासाठी 5,500 किमी रस्ता तयार केला जाणार असल्याचा प्रस्ताव आहे. एक्सप्रेस वे सुरु झाल्यानंतर तो गोंदिया, भंडारा आणि गढचिरोली पर्यंत तयार केला जाणार आहे.