Mumbai Police Logo | (Photo Credits: File Image)

मुंबई (Mumbai) मधील अंधेरी (Andheri) येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लोखंडवाला कॉम्प्लेक्स (Lokhandwala Complex) येथे आई आणि मुलगी यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे. यात आईचा मृत्यू झाला आहे. तर मुलीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. दागिने गायब झाल्यामुळे घरात वाद झाला आणि त्यानंतर या दोघींनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. ('पप्पा, झोपेच्या गोळ्या देऊन आमचा गळा दाबा'; वाराणसीत एकाच कुटुंबातील 4 जणांची आत्महत्या)

मुंबई पोलिस (Mumbai Police) यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी 6:15 च्या सुमारास काही दागिने न मिळल्याने प्रिया सागर (31) या महिलेने आई कमला यांच्याकडे याबद्दल विचारपूस केली. त्यावर मी उद्या दागिने परत देते, असे कमला यांनी सांगितले. मात्र यावरुन एकच वाद पेटला आणि रागाच्या भरात प्रिया यांनी विषारी पदार्थाचे सेवन केले. त्यानंतर प्रियाच्या वडिलांनी तातडीने तिला कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल केले. (हैदराबाद: व्हायरल फिव्हरला 'कोरोना व्हायरस'चा ताप समजून एका 50 वर्षीय व्यक्तीची गळफास लावून आत्महत्या)

ANI ट्विट:

त्याचदरम्यान कमला घरात नसल्याचे नोकराच्या निर्दशनास आले आणि त्याने तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर कमला यांनी संध्याकाळी 6:45 वाजता आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसंच याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली असून पोलिस याचा अधिक तपास करत आहेत.