Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

मुंबईत शुक्रवार पासून सुरू झालेल्या पावसामुळे लोकलच्या वाहतुकीला ब्रेक लागला आहे. मध्य (Central Railway) आणि हार्बर रेल्वेच्या (Harbour Railway)  लोकल उशिराने धावत आहेत. तसंच पश्चिम रेल्वे (Western Railway)  सेवेवरही पावसाचा परिणाम झाला आहे. पावसामुळे लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेवर सकाळी आधीच्या स्थानकांवरच काही गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या, त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले होते. अद्यापही रेल्वे पूर्वस्थितीत कार्यरत नसून यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक 25 मिनिटे उशिराने धावत आहे तर हार्बर व पश्चिम रेल्वेवर देखील गाड्यांचा वेग मंदावला आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाने नेहमीप्रमाणे दिलगिरी व्यक्त करून आपण सेवा पुर्वव्रत आण्यांसाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले आहे.

याशिवाय लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांसोबतच मुंबई कडून पुण्याला जाणाऱ्या व पुण्याहून मुंबईला  येणाऱ्या प्रगती एक्स्प्रेस, सिंहगड एक्स्प्रेस आणि पनवेल पॅसेंजर या गाड्या 29 आणि 30 जूनला रद्द करण्यात आल्या आहे. भुसावळ-पुणे-भुसावळ ही एक्स्प्रेस दौंड आणि मनमाड मार्गे सोडण्यात येणार आहे अशीही माहिती मिळाली आहे.  त्यामुळे चाकरमान्यांसह लांबच्या प्रवाशांना देखील त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान मुंबईतली लोकल वाहतूही उशिराने सुरू आहे.