Mumbai Metro च्या Metro 7, Metro 2A लाईनचं गुढी पाडवा च्या मुहूर्तावर लोकार्पण
Mumbai Metro (Photo Credits: ANI)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते 2 एप्रिलला गुढी पाडव्याच्या (Gudi Padwa) मुहूर्तावर मुंबई मेट्रो (Mumbai Metro) च्या दोन नव्या लाईनचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. मुंबई पूर्व-पश्चिमला जोडणारी घाटकोपर- वर्सोवा या लाईननंतर आता तब्बल 8 वर्षांनंतर मुंबईकरांच्या सेवेत Metro 2A आणि Metro 7 या अजून 2 मार्गिका येणार आहेत.

IANS वृत्तसंस्थेला MMRDA Metropolitan Commissioner S.V.S Srinivas यांनी दिलेल्या माहितीनुसार मराठी नववर्ष गुढीपाडवा दिवशी मुंबईकरांना दोन नव्या मेट्रो मार्गिका मिळणार आहेत. या दोन्ही मार्गिकांचे वैशिष्ट्य म्हणजे या ड्रायव्हरलेस असणार आहेत. काही दिवसांपूर्वीच आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे यांनी या मेट्रोचं ट्रायल रन्स मध्ये सहभाग घेतला होता.  

Metro 2A आणि Metro 7 ला काही दिवसांपूर्वी केंद्राकडून हिरवा कंदील मिळाला आणि आता त्यांच्या प्रवासाचा मार्ग मोकळा झाला आहे. मेट्रो 2 ए ही दहिसर वेस्ट ते डी एन नगर पर्यंत धावणार आहे. तर Metro 7 चा मार्ग दहिसर ईस्ट ते अंधेरी ईस्ट असणार आहे. या दोन नव्या मेट्रो मार्गिकेमुळे पश्चिम उपनगरात प्रवास करणार्‍यांची वाहतूक कोंडी मधून सुटका होणार आहेत.

मेट्रो 7 चा टप्पा 33.50 किमीचा आहे ज्यामध्ये 29 स्थानकांचा समावेश असणार आहे. तर मेट्रो 2 ए 18 किलोमीटरवर धावणार असून त्यामध्ये 17 स्थानकं आहेत.

मेट्रो 2 ए वरील स्टेशन्स  

'मेट्रो 2 ए हा दहिसर पश्चिम ते डीएन नगर स्थानकापर्यंत आहे. या मार्गावर दहिसर पूर्व, अप्पर दहिसर, कांदरपाडा, मंडपेश्वर, एकसर, बोरिवली (पश्चिम), शिंपोली, कांदिवली (पश्चिम), धनुकरवाडी, वलणई, मालाड (पश्चिम), लोअर मालाड, पहाडी गोरेगाव, गोरेगाव (पश्चिम), ओशिवरा, लोअर ओशिवरा आणि डीएन नगर ही स्थानकं असतील.

'मेट्रो-7' वरील स्टेशन्स  

मेट्रो-7 मार्गावर  दहिसर पूर्व, ओवरीपाडा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, देवीपाडा, मागाठाणे, पोईसर, आकुर्ली, कुरार, दिंडोशी, आरे , गोरेगाव पूर्व (महानंद डेअरी), जोगेश्वरी पूर्व (जेव्हीएलआर जंक्शन), शंकरवाडी, गुंदवली (अंधेरी पूर्व) या स्थानकांचा समावेश आहे.

सध्या मुंबईकरांसाठी वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो रोज सकाळी 6.30 ते रात्री 11.30 या वेळेत चालवली जात आहे.