Metro | (Photo Credits: Maha Metro)

मुंबईकरांच्या सार्वजनिक वाहतूकीवर प्रभावी ठरणाऱ्या मुंबई मेट्रो-3 (Mumbai Metro-3) ची चाचणी आजपासून सुरु झाली. मुख्यमत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या चाचणीस आज हिरवा झेंडा दाखवला. या कार्यक्रमादरम्यान, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणीस यांनी पाठिमागच्या महाविकासआघाडी सरकार आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. मेट्रोसंदर्भातलं राजकारण दुर्देवी होतं असं सांगत आम्ही यापुढे विकासात राजकारण न करता मुंबईकरांच्या आणि जनतेच्या फायद्यासाठी कसे निर्णय घेता येईल यावर भर देऊ अशा आशयाचे वक्तव्य दोघांनीही केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, आम्हाला कमी वेळात जास्त काम करायचे आहे. आम्हाला बॅटींग करण्यासाठी फार वेळ नाही. अडिच वर्षेच आहेत. त्यामुळे आम्हाला कमी वेळात जास्त रन काढायच्या आहेत. मी सभागृहात सांगतले. आजवर तुम्हाला एकच भारी पडत होता. आता एकसे बढकर दो आगे. त्यामुळे आता प्रश्नच नाही. आजकाल पर्यावरण, प्रदुषण अशी कारणे पुढे करत प्रकल्प लांबवले जातात. प्रलंबीत ठेवले जातात. परंतू, आता हे प्रकल्प वेळेत मार्गी लागतील, असेही शिंदे यांनी आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख न करता म्हटले. (हेही वाचा, Chandni Chowk Traffic Problem: मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले 'हे' निर्देश)

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मेट्रोल प्रकल्पाला विरोध झाला. त्यामुळे प्रकल्पावरील खर्च वाढला. मात्र आता मेट्रो लाईन ३च्या पहिल्या ट्रेनची चाचणी यशस्वी झाली आहे.त्यामुळे मुंबई मेट्रोला धावण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही, असे मला वाटते, असा टोला त्यांनी ठाकरे पितापुत्रांना लगावला. तर मुख्यमंत्री झाल्यापासून मेट्रो कामातील विवध अडचणी एकनाथ शिंदे यांनी दूर केल्या, असे कौतुगोद्गारही फडणवी यांनी या वेळी काढले.