Metro Aqua Line 3 | X

मुंबई मध्ये वाहतूक कोंडी ही मोठी समस्या आहे. त्यावर मात करण्यासाठी अनेक मोठे इन्फ्रास्टचर प्रोजेक्ट सुरू आहे.  मुंबई मेट्रो 3 (Mumbai Metro-3) ही मुंबईतील एक महत्त्वाच्या प्रोजेक्टपैकी आहे. मुंबई शहरात रेल्वे आणि बस वाहतूकीसोबत आता मेट्रो ला देखील मोठी प्रवासी संख्या दिसून येत आहे.  मुंबई मेट्रो 3 ही भूमिगत मेट्रो सेवा आहे त्यामुळे या प्रोजेक्टबद्दल अधिक उत्सुकता आहे. सध्या मुंबई मेट्रो 3 चा आरे कॉलनी ते  बीकेसी पर्यंतचा टप्पा सुरू आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, 10 एप्रिल पासून हा मुंबई मेट्रो 3 चा दुसरा टप्पा वरळी पर्यंत वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईच्या पश्चिम उपनगरामधून मध्य मुंबई मध्ये प्रवासाचा अजून पर्याय मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे. Mumbai Metro Line 3 Trial Runs: धारावी ते आचार्य अत्रे चौक या मुंबई मेट्रो अॅक्वा लाइन 3 ची ट्रायल रन सुरू, येथे पाहा व्हिडीओ .

मुंबई मेट्रो 3 चा तिकीट दर काय असेल?

अद्याप मुंबई मेट्रो 3 च्या दुसर्‍या टप्प्यातील सार्‍याच तिकीट दरांची माहिती देण्यात आलेली पण पहिल्या टप्प्यातील शेवटचे स्थानक आरे कॉलनी आणि दुसर्‍या टप्प्यातील शेवटचे स्थानक आचार्य अत्रे चौक या प्रवासासाठी 60 रूपये मोजावे लागतील.

मुंबई मेट्रो 3 च्या दुसर्‍या टप्प्यातील स्थानकं

मुंबई मेट्रो 3 च्या दुसर्‍या टप्प्यातील स्थानकांमध्ये धारावी, शितलादेवी मंदिर, दादर, सिद्धिविनायक मंदिर, वरळी आणि आचार्य अत्रे चौक यांचा समावेश आहे.

दरम्यान अ‍ॅक्वा लाईन म्हणजेच मुंबई मेट्रो 3 ला Metro 2A, Metro 7 आणि Metro- 1 देखील विविध ठिकाणी जोडण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण प्रवास मेट्रो ने देखील करता येऊ शकतो.

मुंबई मेट्रो कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सध्या एमएमआरसी दुसऱ्या टप्प्यासाठी सज्ज आहे. दुसरा टप्पा (बीकेसी ते कफ परेड) 93%, तर संपूर्ण प्रकल्प 95% पूर्ण झाला आहे.