Mega Block Updates: मुंबईकरांनो आज (रविवार, 22 सप्टेंबर 2019) सुट्टीचा दिवस म्हणून घराबाहेर पडत असाल तर आगोदर रेल्वे वेळापत्रक तपासा. रेल्वे प्रशासनाने आज तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेतला आहे. त्यामुळे मध्य रेल्वे (Central Railway), हार्बर रेल्वे (Harbor Railway) आणि पश्चिम रेल्वे (West Railway) असे तिनही रेल्वेमार्ग काही तास वाहतूकीसाठी पूर्ण किंवा अंशत: बंद राहणार आहेत. विविध त्रांत्रिक कामे पूर्ण करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात येतो. त्यामुळे काही ठिकाणी लोकल रेल्वे गाड्या रद्द केलेल्या असतील किंवा काही ठिकाणी त्या उशीराणे धावत असतील.
मध्य रेल्वे-मुख्य मार्ग
मध्य रेल्वे मार्गावर सकाळी सव्वा आकरा ते दुपारी पावणेचार या काळात मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे कल्याणपासून सूटणाऱ्या जलद गाड्या दिवा ते परळ या दरम्यान, धीम्या मार्गावरुन चालतील. तसेच, धीम्या मार्गावरुन चालणारी रेल्वे वाहतूक दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावणार आहे. रत्नागिरी-दादर पॅसेंजर गाडी दिवा स्थानकातच थांबेन व तेथूनच रत्नागिरीसाठी रवाना होईल.
हार्बर मार्ग
हार्बर रेल्वे मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत कुर्ला ते वाशी दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक असेन. त्यामुळे सीएसएमटी ते वाशी, बेलापूर, पनवेल दरम्यानच्या दोन्ही मार्गावरील फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल दरम्यान लोकलच्या विशेष फेऱ्या चालवल्या जातील.
पश्चिम रेल्वे
पश्चिम रेल्वे मार्गावर सकाळी 1.35 ते दुपारी 2.35 या कालावधीत मुंबई सेन्ट्रल ते माटुंगा अप व डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे दोन्ही जलद मार्गावरील गाडय़ा सांताक्रुझ ते मुंबई सेन्ट्रल दरम्यान धीम्या मार्गावर धावतील.
मुंबई रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक असल्यामुळे आज सुट्टीच्या दिवशी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची काहीशी कोंडी होणार आहे. त्यामुळे प्रवास करायचा असेल तर, मुंबईकरांना रस्तेवाहतूकीचा पर्याय निवडावा लागणार आहे. अपवाद वगळता साधारण मुंबई रेल्वे प्रत्येक रविवारी मेगाब्लॉक घेत असते. रेल्वे आणि रेल्वेमार्गावरील तांत्रिक कामे पूर्ण करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून मेगाब्लॉक घेण्यात येतो.