Megablock (Photo Credits:Twitter)

Mumbai Mega Block: मुंबईच्या रेल्वेमार्गांवर दर रविवारी दुरुस्तीच्या कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येतो. त्यामुळे आज (28 जुलै) देखील रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण ते ठाणे दरम्यान जलद मार्गांवर तर पश्चिम रेल्वे मार्गावरील भाईंदर ते वसई रोड दरम्यान जलद मार्गावर जम्बोब्लॉक असणार आहे. हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या देखील आज रद्द करण्यात आल्या आहेत.

मध्य रेल्वे

कल्याण ते ठाणे-सीएसएमटी दिशेकडील जलद मार्गावर सकाळी 11.20 ते दुपारी 3.50 पर्यंत ब्लॉक असेल. या काळात कल्याणहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या जलद लोकल ठाणे स्थानकापर्यंत धिम्या मार्गावरुन धावतील.

पश्चिम रेल्वे

भाईंदर ते वसई रोड स्थानकांदरम्यान सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत दोन्ही दिशेकडील जलद मार्गावर ब्लॉक असेल. या काळात चर्चगेट दिशेकडील लोकल विरार/वसई रोडहून भाईंदर/ बोरीवलीपर्यंत धिम्या मार्गावर धावतील.

हार्बर रेल्वे

सीएसएमटी-वडाळा रोडकडून पनवेलकडे सकाळी 11.34 ते दुपारी 4.23 वाजेपर्यंत तर सकाळी 11.40 ते दुपारी 4.10 पर्यंत सीएसएमटीहून चुनाभट्टी, वांद्रेच्या दिशेने एकही लोकल धावणार नाही.

सकाळी 11.10 ते दुपारी 3.40 पर्यंत चुनाभट्टी, वांद्रेहून सीएसएमटीकडे तर, सकाळी 9.56 ते दुपारी 4.16 पर्यंत वांद्रे, गोरेगावच्या दिशेने एकही लोकल रवाना होणार नाही.

सकाळी 9.53 ते दुपारी 2.44 पर्यंत पनवेल, बेलापूर, वाशीहून सीएसएमटीसाठी लोकल नसेल. सकाळी 10.45 ते दुपारी 4.58 पर्यंत वांद्रे, गोरेगावहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलही रद्द केल्या आहेत.

मागील दोन-तीन दिवसांपासून मुंबईसह उपगनरांत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे आधीच रेल्वे वाहतूकीचा खोळंबा झाला आहे. त्यात उद्याचा मेगाब्लॉक प्रवाशांचा त्रास अधिक वाढवू शकतो. त्यामुळे रेल्वे अपडेट्स, मेगाब्लॉकचे वेळापत्रक तपासूनच घराबाहेर पडल्यास होणारा त्रास वाचू शकतो.