Measles Outbreak | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

मुंबईमध्ये गोवर (Mumbai Measles Outbreak) आजाराचा प्रादुर्भाव वाढतो आहे. आजच (बुधवार, 23 नोव्हेंबर) 8 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूसोबत आजवर मृतांची संख्या 12 वर पोहोचली आहे. याच आजारामुळे एक दिवसापूर्वीच आणखी एका मुलाचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गोवरचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांची संख्या 233 इतकी आहे.

राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा मंगळवारी दक्षिण मुंबईतील राज्य सचिवालयात झालेल्या बैठकीत घेतला. या बैठकीला राज्याच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह बीएमसीचे अधिकारी आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या डॉ. मीता वाशी आणि डॉ अरुण गायकवाड उपस्थित होते.

दरम्यान, मुंबई व्यतिरिक्त, झारखंडमधील रांची, गुजरातमधील अहमदाबाद आणि केरळमधील मलप्पुरममध्येही मुलांमधील गोवरच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. गोवरच्या वाढत्या प्रादुर्भाववर उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारही आपली पथके पाटवत असल्यचे समजते. ही पथके गोवरच्या वाढत्या प्रकाराची कारणे आणि उपाययोजना या दृष्टीने आढवा घेऊन मार्गदर्शन करणार आहेत, असे सरकारी सूत्रांनी म्हटले आहे.