प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

मुंबईत (Mumbai) 7 जुलै पासून बेकायदेशीर ठिकाणी गाडी पार्किंग केल्यास दंडाची वसूली करण्यात येणार असल्याचा नियम महापालिकेने  (BMC) लागू केला आहे. त्यानुसार नागरिक आता बेकायदेशीर ठिकाणी गाडी पार्क करण्यापूर्वी विचार करत आहेत. परंतु चक्क मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर (Vishwanath Mahadeshwar) यांनी त्यांची गाडी चक्क नो पार्किंग (No Parking) क्षेत्रात उभी केल्याची बाब समोर आली आहे. तरीही महापौरांवर कोणताही दंड किंवा कारवाई करण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे लवकरच महापौरांच्या या वागण्याचा मुद्दा आता लवकरच उलचून धरण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबईत सध्या फार कमी ठिकाणी कायेदशीर गाडी पार्किंगसाठी जागा उपलब्ध आहे. तसेच दिवसेंदिवस वाढत्या लोकसंख्येमुळे वाहनांची संख्यासुद्धा वाढत असल्याचे दिसून येते. तर बहुतांश वेळा रस्ते, शाळा, महाविद्यालय, हॉस्पिटल किंवा अन्य महत्वाच्या ठिकाणी बेकायदेशीरित्या गाड्या पार्किंग केलेल्या दिसून येतात. त्यामुळे अशा बेकायदेशीर गाडी पार्किंगवर चाप बसण्यासाठी महापालिकेकडून दंडाच्या वसूलीसह वाहनचालकावर कारवाई करण्यात येणार असल्याच निर्णय देण्यात आला. मात्र निर्णयाच्या काही दिवसांतच महापौरांनी हे नियम ढाब्यावर बसवलेले दिसून येत आहे. त्याचसोबत सामान्य नागरिकाने ही चूक केली असता त्यांना थेट ई-चलन देण्यात येत आहे. मात्र आता महापौरांनी ही चूक केली तरीही त्यावर कोणतेही कारवाई किंवा दंडवसूली नाही अशी बाब समोर आली आहे. या प्रकारामुळे मुंबईकरांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

(मुंबईत बेकायदेशीर गाडी पार्किंग केल्यास 15 हजारापर्यंत दंड वसूल करणार)

तर बेकायदेशीर गाडी पार्किंग केल्यास 15 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच 500 मीटरच्या आतमध्ये गाडी पार्क केल्यास गाडी वाहतूक पोलिसांकडून टो केली जाणार आहे. त्यामुळे मुंबईत पार्किंगसाठी चालकांना शिस्त शिकवण्यासाठी एक निर्णय घेण्यात आला होता. परंतु आता महाडेश्वर यांनीच नियमांचे उल्लंघन केले असून त्यांच्यावर काय बोलावे याचा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे.