Mumbai Mayor Kishori Pednekar (Photo Credits: ANI|File)

मुंबईच्या राणीच्या बागेत नुकत्याच जन्माला आलेल्या पेंग्विन आणि वाघाच्या बछड्यांचं नाव 'ऑस्कर','ओरिओ ' आणि वीरा ठेवण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी केक कापून त्याचा आनंद देखील साजरा केला मात्र भाजपाकडून चित्रा वाघ यांनी या नामकरणावर आक्षेप घेत मराठीला फक्त पाट्यांपुरता भाव, युवराजांच्या पेंग्विनंच नाव मात्र इंग्रजीत, अशी खोचक प्रतिक्रिया देणारं ट्वीट केल्याने आता पुन्हा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी यावर तितकीच सडेतोड प्रतिक्रिया देताना पुढे राणीच्या बागेत जन्माला येणार्‍या हत्ती आणि माकडीणीच्या पिल्लांचं नाव 'चिवा' आणि चंपा ठेवू असं म्हटलं आहे.

आज पत्रकार परिषदेमध्ये बोलताना किशोरी पेडणेकरांनी भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. "आम्ही सामान्य जनतेसाठी चांगली कामं करत आहोत. पण त्याच्याकडे केवळ विरोधाला विरोध म्हणून पाहत इतक्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं योग्य नाही. वाघिणीच्या पिल्लाचं नाव वीरा ठेवलं आहे. हे नाव मराठी आहे. प्राण्यांची नावे मराठीत ठेवण्याची भाजपची मागणी असेल तर यापुढे हत्तीच्या पिल्लाचं चंपा असं नाव ठेवू आणि माकडाच्या पिल्लाचं चिवा असं नाव ठेवू, असा टोला किशोरी पेडणेकर लगावला आहे. नक्की वाचा: Fact Check: वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाचे नाव केले 'हजरत अली पीर बाबा राणी बाग'; जाणून घ्या व्हायरल होत असलेल्या पोस्टमगचे सत्य.

चित्रा वाघ ट्वीट

दरम्यान राज्यात सध्या महाविकास आघाडी मधील कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी 'मोदी' वरून एक आक्षेपार्ह विधान केल्याने त्यावरून भाजपा आक्रमक झाली आहे. त्यातच या नव्या शाब्दिक चकमकीने पुन्हा अजून वाद वाढण्याची चिन्हं आहेत.