Veer Mata Jijabai Bhosale Udyan And Zoo | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

'राणीची बाग' (Rani's Baugh) नावाने प्रसिद्ध असलेले मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान (Veer Mata Jijabai Bhosale Udyan) शहराची एक ओळख आहे. याच बागेबाबत एक फोटो सोशल मीडियात (Social Media) व्हायरल होतो आहे. व्हायरल फोटोवरुन संतापही व्यक्त केला जातो आहे. या फोटोत 'वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान' हे नाव बदलून 'हजरत अली पीर बाबा राणी बाग' असे केल्याचा दावा केला जातो आहे. याबाबत तथ्य पडताळणी केल्यावर आढळून आले की, असे कोणतेही नामकरण झाले नाही. 'वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान' हे नाव कायम आहे. उद्यानावरील पाटीही याच नावाची असून, मुंबईच्या महापौरांनी याबाबत स्पष्टीकरणही दिले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोवर विश्वास न ठेवण्याचे अवाहन केले जात आहे.

सोशल मीडियावर हा वादग्रस्त फोटो अनेक लोक फॉर्वर्ड करत आहेत. सोशल मीडिया युजर्सनी या फोटोची सत्यता पडताळून पाहायला हवी. सत्य जाणून घेऊन मगच अशा गोष्टी फॉर्वर्ड करायला हव्यात. मात्र, नेमके तेच होताना दिसत नाही. काही लोक फोटोसोबत कॅप्शनही देत आहेत की, 'आता नुसती राणीची बाग नाही तर हजरत हाजी पीर बाबा राणीची बाग असं म्हणायचं'. तुम्हालाही असा फोटो आला असेल तर थांबा. हा फोटो अजिबात फॉर्वर्ड करु नका. पहिली सत्य आण तथ्य पडतळणी करा. (हेही वाचा, मुंबई: भायखळा मधील राणीच्या बागेत Penguins नंतर आता Anacondas आणण्याची तयारी सुरू)

सोशल मीडियावर खोटा फोटो व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोत काळ्या ग्रॅनाईटबोर्डावर 'मुंबईच्या राणी बागेचं नाव आता हजरत अली पीर बाबा राणी बाग' असे लिहिल्याचे आढळून येते. वास्तवात मात्र असे काहीही बदललेले नाही. हा फोटो तद्दन खोटा आणि बनावट आहे. दरम्यान, या उद्यानाच्या प्रवेशद्वारावर आणि प्रवेशासाठी दिल्या जाणाऱ्या तिकिटांवर 'बृहन्मुंबई महानगरपालिका वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय' असे स्पष्ट लिहिण्यात आले आहे. महापौरांनीही याबाबत माहिती दिली आहे.

ट्विट

बृहन्मुंबई महानगरपालिका वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयाची स्थापना 1861 मध्ये करण्यात आली. स्थापना करण्यात आली त्या वेळी या उद्यानाचे नाव व्हिक्टोरिया गार्डन(Victoria Garden) असे होते. शहरातील मराठी लोक या गार्डनचा उल्लेख 'राणीची बाग' असा करत असत. मात्र, भारत स्वतंत्र झाला. तेव्हा या बागेचे नाव 'वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहाल' असे करण्यात आले.