Representational Image (Photo Credit: ANI)

मुंबई लोकलमधून प्रवास करण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी  (Essential Service  Employee) असल्याचे दाखवून बनावट आयडी वापरणाऱ्या एका चप्पल दुकानाचा मालकाला अटक करण्यात आली आहे. सध्या लोकलमधून फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवास करण्याची परवानगी आहे. अॅन्टटॉप हिल मधील रहिवाशी असलेल्या जलालउद्दीन अन्सारी याला लोकमध्ये वडाळा जवळ 4.18 वाजता पकडल्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र पाल यांनी म्हटले आहे.

स्थानकात तिकिट तपास करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या पास संदर्भात संशय आला. तसेच व्यक्तीचा पास हा बनावट असून त्याने तो महापालिकेच्या सार्वजिक आरोग्य विभागातील कर्मचारी असल्याचे ही म्हटले. या प्रकरणी त्याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती TOI यांनी दिली आहे.(नवी मुंबई: ई-पाससाठी बनावट आधार कार्ड वापरणाऱ्या दोघांना पोलिसांकडून अटक) 

कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने रुग्णांसह बळींचा आकडा सुद्धा वाढत आहे. परंतु राज्यात कोरोनाच्या रुग्णांचा रिकव्हरी रेट अधिक असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तर सर्वत्र आता अनलॉकिंगनुसार काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी दिली आहे. परंतु अद्याप लोकल सामान्य व्यक्तींसाठी सुरु करण्यात आलेली नाही. या लोकलमधून फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी प्रवास करु शकतात. मात्र या कर्मचाऱ्यांना ते अत्यावश्यक सेवेतील काम करत असल्याचा पुरावा दाखवावा लागतो तर त्यांना प्रवासासाठी परवानगी दिली जाते.

दरम्यान, राज्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी स्वत:सह परिवाराची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. कोरोनावर अद्याप ठोस लस उपलब्ध नसल्याने जगभरातील संशोधक त्या संदर्भात अभ्यास करत आहेत. परंतु डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय सेवेतील कर्मचारी कोरोनाच्या काळात रुग्णांवर अहोरात्र उपचार करत आहेत. त्याचसोबत कोविड योद्धे सुद्धा आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य चोख पद्धतीने बजावताना दिसून येत आहे. तर राज्यात लॉकडाऊन एकत्रितपणे उठवण्यात येणार नाही. परंतु हळूहळू लॉकडाऊन उठवला जाईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.