मुंबई: नग्न अवस्थेत रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरुग्णाने घेतला पोलिस कॉन्स्टेबलच्या बोटाला चावा
Police | Image Used for Representational Purpose Only | (Photo credits: PTI)

मुंबईतील (Mumbai) नागपाडा जंक्शन (Nagpada Junction) परिसरात नग्न अवस्थेत (Naked Man) रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरुग्णाने पोलिस कॉन्स्टेबलच्या (Police Constable) बोटाला चावा  (Bit) घेतल्याची घटना घडली आहे. यात पोलिस कॉन्स्टेबलच्या बोटाचा तुकडा पडला आहे. जनार्दन साखरे, असं या पोलिस कॉन्स्टेबलचं नाव असून तो नागपाडा पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. साखरे यांच्यावर मुंबईतील जे. जे रुग्णालयात (J J Hospital) उपचार सुरू आहेत. यासंदर्भात मिड-डे या इंग्रजी वेबसाईटने वृत्त प्रकाशित केले आहे.

पोलिस कॉन्स्टेबल जनार्दन साखरे हे बुधवारी नागपाडा येथे गस्तीवर होते. दरम्यान, नागपाडा जंक्शननजवळ मोहम्मद शकील शब्बीर हुसेन नावाचा मनोरुग्ण नग्न अवस्थेत गोंधळ घालत होता. त्यावेळी तेथील नागरिकांनी पोलिसांना मदत करण्यासाठी पाचारण केले. त्यामुळे जनार्दन साखरे हे मदतीसाठी गेले. त्यावेळी मनोरुग्णाने साखरे यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्या शेजारील बोटाचा चावा घेतला. यात साखरे यांच्या बोटाचा तुकडा पडला. त्यानंतर साखरे यांना तात्काळ उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले.  (हेही वाचा - अहमदनगर: प्रेयसीसोबतचे Sex Videos मोबाईलमधले पाहिले म्हणून नवऱ्याने बाकोला जिवंत जाळले)

शकिल एक मनोरुग्ण आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची मानसिक स्थिती चांगली नाही. या सर्व प्रकारानंतर नागपाडा पोलिसांनी शकिलच्या कुटुंबियांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर आरोपी शकिलच्या भावाने पोलिसांना तो मानसिक रुग्ण असल्याची माहिती दिली आहे. शकिलची पत्नी त्याला सोडून गेली. तेव्हापासून त्याचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचेही शकिलच्या भावाने पोलिसांना सांगितले आहे.